निःशब्द! उकळत्या भाजीत पडून चिमुकल्याचा अंत; वाचून डोळ्यात पाणी येईल

औरंगाबाद | शहरातील सोबलगव येथे आईसोबत गेलेल्या पाहुण्याच्या घरी वरणात पडून चिमुकल्याचा जीव गेल्याची घटना घडली आहे. पाहुण्यांच्या घरीच स्वयंपाक चालू असतानाच ही घटना घडल्याची सांगितली जाते. हसनाबाद येथील पाच वर्षाचा मुलगा आपल्या आईसोबत पाहुण्यांचे घरी गेला होता.
योगिराज नारायण अकोदे हा पाच वर्षाचा मुलगा सोबत होता. तो गरम वरणात पडून मरण पावला आहे. सायंकाळच्या वेळी पाहुणचार चालू असतानाच तो चिमुकला भांड्याजवल आला आणि त्याच्या तोल जाऊन उकळत्या वरणात पडला.
योगिराज हा उकळत्या वरणा मध्ये पडला असल्याने जखम झाली होती. योगिराज इतका भाजला होता की त्याला हॉस्पिटल ला घेऊन जाण्यापूर्वीच मृत्यू पावला. आपल्या डोळ्यासमोर मुलाचा झालेला मृत्यू पाहून आईने रडायला सुरुवात केली.
परिसरातील लोकांनी झालेली घटना पाहून हळहळ व्यक्त केली. पाच वर्षाच्या चिमुकल्याचा जीव गेल्याने परिसरातील नागरिकांमधून शोक व्यक्त होत होता. अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकल्यांनी जग पहायच्या अगोदरच जगाला सोडून गेला.
सदर घटनेनं पूर्ण जिल्ह्यात शोक व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आपली मुलं काय करतात, कुठे खेळत आहेत. याकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. सदर घटना ही अतिशय हद्र्याला लागणारी आहे. अनेक दिग्गजांनी चिमुकल्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.