निःशब्द! छोट्याशा चुकीमुळे गेला पोलीस पती – पत्नीचा जीव. १७ वर्षाचा संसार झाला काही क्षणात उध्वस्त…

कर्नाटक | गेल्या काही दिवसापासून रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्र सोबतच इतर राज्यांतूनही या रस्ते अपघातामुळे लोकांमध्ये लोकांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. कर्नाटक राज्यात एका इन्स्पेक्टर आणि त्याच्या बायकोला आपला जीव या रस्त्यावरील अपघातामुळे गमवावा लागला.
या झालेल्या अपघातामध्ये पती आणि पत्नी या दोघांना ही आपला जीव जागीच गमवावा लागला. महामार्गावरील रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या कंटेनर ला गाडी पाठीमागून धडक बसून हा अपघात घडला आहे. हा अपघात इतका मोठा होता की या अपघातामध्ये कार गाडी ही कंटेनरमध्ये मागून घुसली गेली. त्यावेळी गाडीत असणारे पती आणि पत्नी जागेवरच मरण पावले.
मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात कर्नाटक मध्ये कल्बुर्गी या ठिकाणी घडला. या अपघातामध्ये सिंदागी या ठिकाणी कार्यरत असणारे पोलीस अधिकारी रवी उकंड आणि त्याची बायको मधू हे जागेवरच ठार झाले. स्टेशनरी भरून घेऊन जात असलेला कंटेनर हा रस्त्याच्या कडेला थांबलेला होता. हायवे रस्ता असलेला हा कंटेनर डाव्या बाजूस पार्क केला होता. पोलिस इन्सपेक्टर रवी हे पाठीमागच्या बाजूने स्विफ्ट डिझायर ही गाडी घेऊन आले होते. बुधवारी आपल्या पत्नीसोबत गाडीत येत असताना ही दुर्घटना घडली.
गेल्या सहा वर्षांपासून उकडा हे पोलीस मध्ये काम करत होते. गेल्या काही दिवसापूर्वीच त्यांना इन्स्पेक्टर ही पदवी मिळाली होती. या झालेल्या अपघातामुळे पोलीस डिपार्टमेंट मधून हळहळ व्यक्त होत आहे. रवी हे आपल्या बायकोसोबत जात असताना त्यांना पुढे पार्क केलेला कंटेनर चा अंदाज आला नाही . त्यामुळे त्यांचे गाडीच्या वेगवरील नियंत्रण सुटले आणि गाडी सरळ कंटेनर च्या मागच्या भागात घुसली. गाडीचा वेग हा भयानक असल्यामुळे हा अपघात इतका भीषण होता की रवी आणि त्याची पत्नी मधू जागेवरच ठार झाले.
या स्विफ्ट डिझायर कारच्या पुढील बाजूस मोठा फटका बसला होता. गाडीचे पुढील दोन्ही चाके कंटेनर मध्ये अडकलेली होती. अपघातानंतर कंटेनर च्या मागच्या भागात अडकलेली कार काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. या अपघाताची नोंद कर्नाटक पोलिसांनी घेतली आहे. एका चांगल्या पोलिसाचा अपघातात मृत्यू झाल्याने सर्व पोलीस दलाने हळहळ व्यक्त केली.