निःशब्द! 6 वर्षाच्या चिमुकल्याला डॉक्टरांनी केलं मृत घोषित, माञ त्यानंतर जे घडलं ते पाहून डोळयात पाणी येईल

मुंबई | देवतारी त्याला कोण मारी या म्हणी प्रमाणेच काहीसे हरियाणा मध्ये घटना घेऊन गेली. असे म्हंटले जाते की जन्म आणि मृत्यू हे कोणाच्याच हातात नसते. जो पर्यंत ईश्वराची इच्छा होत नाही तो पर्यंत कोणीच जन्म घेऊ शकत नाही ना मृत होत नाही. ज्याच्यावर देवाचे लक्ष आहे त्याला कोणीच मारू शकत नाही.ना कोणी त्याला इजा पोहचवू शकत नाही.
असाच प्रकार एक बहादूरगड या ठिकाणी पहायला आपल्याला मिळतो. या ठिकाणी एका ६ वर्षाचा जीव गेला आणि पुन्हा परत ६ वर्षाचा चिमुरडा जिवंत झाला. त्याला पुन्हा जीवदान मिळण्याचे कारण त्याची आजी होती. त्याच्या आजीला शेवटच्या वेळी त्याचा चेहरा पहायचं होता , एवढंच..! आजीच्या आग्रहामुळे नातवाला स्मशान भूमीत घेऊन जाण्याऐवजी हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यात आले.त्यामुळे तो चिमुरडा पुन्हा जिवंत झाला.
मिळालेल्या माहिती नुसार कुणाल शरमा हा हरियाणा मधील बहादूरगड फोर्ट मध्ये राहत आहे. कुनालच्या वडिलांचे कपड्याचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी कुणाल याला टायफॉइड झाला होता. त्याची तब्येत खालावत चालली होती. त्यामुळे त्याला हॉस्पिटल मध्ये admit करण्यात आले होते. तरीही तो तेथे नीट झाला नसल्याने त्याला दिल्ली या ठिकाणी दवाखान्यात घेऊन जावे लागले.
दिल्लीतील हॉस्पिटल मध्ये उपचार चालू असतानाच त्याचा श्वास थांबला होता.त्यामुळे घरच्यांनी त्याला मृत समजून घरी आणले होते. मुलाच्या मृत्यू मुळे सगळे कुटुंब रडत होते. त्यांचे पाहूणे नातेवाईक येऊ लगले होते. घरातील लोकांनी बर्फ घेऊन आले होते. स्मशान भूमी शोधत होते. कुनालची आई ही सारखी रडत होती. सारखी सारखी कुणाल ला उठ म्हणून हाक मारत होती. यामुळेच का होईना त्याच्या पुन्हा श्वास येऊ लागला.
हरियाणामधील विजय शर्मा याचा नातू कुणाल शर्मा हा २ ने ला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. कुणाल चा मृतदेह त्याची आई जानवी आणि वडील हितेश यांच्याकडे कागदात गुंडाळून दिला होता. परंतु घरी आणल्यानंतर तो पुन्हा एकदा जिवंत झाल्याची घटना घडली आहे.
घरी आणल्यानंतर कूनालच्या अंत्य विधी साठी तयारी करण्यात येत होती. कुणाल चा मृत्यू झाल्याने त्याला मामाच्या गावी अंत्य विधी करण्याचे ठरवले होते. परंतु आजीने नातवाला चेहरा पाहुद्या असा हट्ट धरला होता. त्यामुळे कुणाल ला स्मशानभूमीत घेऊन जाण्याऐवजी घरी घेऊन आले. आजीने जर आग्रह धरला नसता तर कुणाल चे अंत्य विधी केले असते. घरी आणल्यानंतर पुन्हा कूनालची आई जानवी आणि ताई अन्नू हे रडू लागले. हे जिवंत होण्यासाठी पुन्हा हाक मारू लागले होते.
काही वेळाने कुणाल चा मृत देह हलक्या हलक्या पद्धतीने हलत होता हे जाणवत होते. या हालचाली पाहिल्यावर कुणाल ला कापडातून बाहेर काढले आणि त्याला त्याच्या वडिलांनी तोंडातून श्वास दिला. पुन्हा कुणाल मध्ये हालचाली झाल्या. नंतर त्यांनी छातीवर दाब दिला.असे केल्याने श्वास लगेच चालू होतो हे त्यांनी फिल्म मध्ये पाहिले होते.त्यामुळे त्याने असे करण्यास सुरुवात केली. चिमुरड्यांचा गेलेला जीव पुन्हा परत आला होता. त्यामुळे सर्वांना आनंद झाला होता.