मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा! अजून एका प्रसिध्द अभिनेत्याचे निधन; अनेक चित्रपटांमध्ये साकारली होती भूमिका

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीला झालंय तरी काय? असा सवाल व्यक्त केला जात आहे. कारण काल मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री कल्याणी कराले जाधव हीचे अपघाती निधन झाले आणि आज एका प्रसिध्द अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीला कोणाची नजर तर लागली नाही ना? असा सवाल व्यक्त केला जात आहे.

Join WhatsApp Group

 

अनेक चित्रपटात भूमिका साकारून हजारो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या आणखी एका दिग्गज अभिनेत्याचे निधन झाले आहे. मराठी अभिनेते सुनील शेंडे यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी रात्री मुंबई मधील विले पार्ले येथील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे.

 

अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. सुनील यांना मराठी चित्रपट सृष्टीतील एक ज्येष्ठ आणि प्रसिध्द अभिनेते म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आजपर्यंत अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यांनी वास्तव या चित्रपटात भूमिका साकारून अनेक मने जिंकली आहेत. तसेच त्यांचा गांधी या चित्रपटात देखील त्यांनी काम केले होते.

 

त्यांच्या मृत्यू ने अभिनय क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना मानणारा एक वेगळा मराठी चाहता वर्ग आहे. अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारून लाखो चाहत्यांच्या हृदयात जागा मिळविली होती. मात्र त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button