मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेत्री सोनाली कुलकर्णीवर दुःखाचा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन

मुंबई | सोनाली कुलकर्णी ही तिच्या सुंदर अभिनयाने नेहमीच प्रकाश झोतात राहते. नुकताच तिचा तमाशा लाईव्ह हा चित्रपट प्रदर्शित झाला. यावेळी ती खूप खुश होती. तिने आपल्या चित्रपटाचे सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन केले. यात तिने छंद लागला या गाण्यावर भन्नाट डान्स करून सर्व चाहत्यांना गुरकी चॅलेंज दिले होते.

 

तसेच कोरोना काळात तिने लग्न केल्याने तिच्या लग्नाची मजा चाहत्यांना फारशी घेता आली नाही. त्यामुळे प्लॅनेट मराठीवर तिच्या लग्नाचा सोहळा दाखवण्यात आला. यात तिने पुन्हा एकदा लग्नातील सर्व विधी पार पाडले. या सर्व गोष्टींमुळे गेले काही दिवस ती खूप खुश होती. मात्र आता नुकतेच तिच्या अगदी जवळच्या एका खास व्यक्तीचे निधन झाले आहे.

 

यामुळे ती खूप दुःखी आहे. सोनालीची अजी आता या जगात नाही. नुकतेच त्यांचे निधन झाले. आजीच्या निधनानंतर सोनालीने सोशल मीडिया वरती एक व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली. तिने आजीबरोबरचे काही क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपलेले होते. प्लॅनेट मराठी वरती तिच्या लग्नाचा जो थाट घालण्यात आला त्यामध्ये देखील तिची आजी शामिल झाली होती. आजीबरोबर घालवलेले सर्व क्षण तिने या व्हिडिओमध्ये एडिट केले होते. हा व्हिडिओ तिने सोशल मीडिया वरती पोस्ट केला आहे तसेच आजीचे निधन झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

 

सोनालीने हा व्हिडिओ पोस्ट करत आजीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे तसेच तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “तू कायमच आमच्याबरोबर असशील.” सोनालीची ही भाऊक पोस्ट पाहून तिचे चाहते देखील तिच्याविषयी सहानुभूती व्यक्त करत आहेत. तसेच तिला या दुखातून सावरण्यासाठी धीर देत आहेत. सोनाली कुलकर्णीने आजवर मराठी चित्रपट सृष्टी बरोबरच बॉलीवूड देखील गाजवले आहे.

 

ग्रॅण्ड मस्ती या चित्रपटामधून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यावेळी तिने अभिनेता रितेश देशमुख बरोबर स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर तिने सिंघम या चित्रपटामध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या चित्रपटातील देखील तिच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले. मराठी सिनेसृष्टीतील नटरंग हा चित्रपट तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. या चित्रपटातील अप्सरा या गाण्यामुळे संबंध महाराष्ट्रात तिला अप्सरा या नावाने ओळखले जाऊ लागले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button