मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा! तुझ्यात जीव रंगला मधील प्रसिध्द अभिनेत्रीचे अपघाती निधन

कोल्हापूर | गेल्या अनेक दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर या जगाचा निरोप घेत आहेत. बॉलिवुड आणि हॉलिवुड मधील तर अनेक कलाकार या जगाला सोडून गेले आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्राला झालंय तरी काय असा सवाल व्यक्त केला जात आहे.

Join WhatsApp Group

 

लता मंगेशकर, रमेश देव यांच्या सारख्या दिग्गज कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे शोककळा पसरली होती. आता सध्या मराठी चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिध्द अभिनेत्री कल्याणी कुरळे जाधव या अभिनेत्रीचे निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

कल्याणी ने एक कोल्हापूर जिल्ह्यातील हालोंडी येथे प्रेमाची भाकर नावाचे हॉटेल चालू केले आहे. त्या हॉटेल मधून ती घरी जात असताना तिला एका ढंपर ने जोरदार धडक दिली यात तीचां जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे मराठी चित्रपसृष्टीत शोककळा पसरली आहे.

 

कल्याणी ने अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. ती एक मराठी प्रसिध्द अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. तिने तुझ्यात जीव रंगला मध्ये अत्यंत चांगली भूमिका साकारून अनेक मनावर राज्य केलं आहे. तिच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button