हिंदी चित्रपटवर शोककळा! राजू श्रीवास्तव यांच्या नंतर आणखी एका दिग्गज अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; अनेक चित्रपटात साकारली होती भूमिका 

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज मान्यवर या जगाचा निरोप घेत आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्राला झालंय तरी काय? असा थेट सवाल व्यक्त केला जात आहे. लता मंगेशकर, बाप्पी लहरी, रमेश देव यांच्या सारख्या दिग्गज कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे.

Join WhatsApp Group

 

आणखी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. आधी कॉमेडियन राजू श्रीवास्तव, त्यानंतर दिपेश भान आणि आता वय वर्षे 46 असलेल्या अभिनेत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त केला जातोय. याचं नाव सिद्धांत वीर सूर्यवंशी आहे. जिममध्ये वर्कआऊट करताना त्यांचं निधन झालं.

 

कुसुम, वारीस, सूर्य करण या मालिकेत त्यांनी अभिनेता म्हणून काम केलं आहे. यामुळे मालिका विश्वात शांतता आणि शोक व्यक्त केला जात आहे. सिद्धांतच्या पश्चात पत्नी एलिशिया राऊत आणि त्याला दोन मुलं आहेत. सिद्धांत हा आपल्या फिटनेसबाबत खूपच काळजी घ्यायचा. आणि तो फिटनेस मुळे ओळखला जायचा.

 

जय भानुशाली यांनी वाहिली श्रद्धांजली – जय भानुशाली सोशल मीडियावर फोटो शेअर करून लिहले की भाऊ तू खूपच लवकर निघून गेलास. त्यांनी याबाबत शोक व्यक्त केला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की मला ही बातमी जिममध्ये वर्कआऊट करणाऱ्या एका कॉमन फ्रेंडकडून मिळाली आहे. आपला सिध्दांत आपल्यात राहिला नाही. ही बातमी अत्यंत काळजाला लागणारी आहे. एक चांगला अभिनेता आज आपल्यातून गेला. असे त्यांनी सांगितले.

 

आनंद वीर सूर्यवंशी अशी देखील होती ओळख – सिद्धांत वीर सिंह याला आनंद सूर्यवंशी म्हणून देखील ओळखले जायचे. त्यान आपल्या करीअरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली होती. कुसुम या मालिकेत त्यान सुरुवातीला पदार्पण केलं. यासह इतर टी.व्ही मालिकेत त्यान काम केलं आणि आपल्या कामाची छाप पाडत चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. कसोटी जिंदगी की, कृष्ण अर्जुण, क्या दिलं मे है पासून अनेक मालिकेत त्यान काम केलंय. क्यों रिश्तोमे कट्टी बट्टी, जिद्दी दिल या मालिकांमध्ये त्यान काम केलं आहे.

 

वैयक्तिक जीवन – सिद्धांतची दोन लग्न झाले आहेत. 2015 ला त्याचा घटस्फोट झाला. दोन वर्षांनी सिद्धांत पूना ॲलीशिया या मुलीशी त्यान विवाह केला. आधीच्या पत्नीकडून त्याला 1 मुलगी आणि दुसऱ्या पत्नीकडून एक मुलगा असा त्याचा संसार होता. त्यांच्या निधनाने अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली देखील अर्पण केली आहे. सध्या त्यांना अनेक स्तरावरून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button