आत्ताच्या घडामोडीमनोरंजन

चित्रपसृष्टीवर पुन्हा शोककळा! प्रसिध्द अभिनेत्रीचे कर्करोगाने निधन; 46व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

दिल्ली | भारतीय चित्रपट सृष्टीवर 25 ऑगस्ट हा दिवस अत्यंत वाईट गेल्याचे पाहायला मिळाले. कारण या दिवशी प्रसिध्द अशा दोन कलाकारांच्या निधनाने पूर्ण अभिनय क्षेत्रात शोकाकुल वातावरण पसरले आहे. प्रसिध्द दिग्दर्शक सावन कुमार यांचे निधन झाले.

 

त्यांच्या निधनाने तर पूर्ण बॉलिवूड वर शोककळा पसरली होती. सावन कुमार यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होत. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला. तर दुसरीकडे प्रसिध्द अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या 46व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.

 

अभिनेत्री हॅप्पी भावसार यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्या मौलिक नायक यांच्या पत्नी होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून हॅप्पी यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्या वेळोवेळी रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र मृत्यू सोबत असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली आहे.

 

वयाच्या अवघ्या 46व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. गुजराती चित्रपट सृष्टीतील त्या एक प्रसिध्द अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या त्यांच्या अचानक मृत्यू मुळे अभिनय क्षेत्रात एक खळबळ उडाली आहे. त्यांच्या निधनावर त्यांच्या पतीने एक भाऊक पोस्ट केली आहे.

 

सुरुवातीच्या काळात त्यांनी छोट्या पडद्यावर काम केले त्यानतंर काही काळात त्या प्रकाशझोतात आल्या आणि त्यानतंर गुजराती चित्रपट सृष्टीत त्यांचं नाव झालं. त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button