मनोरंजन विश्वात शोककळा! प्रसिध्द कलाकाराचे निधन; लाईव्ह कार्यक्रमात घेतला अखेरचा श्वास

मुंबई | मनोरंजन विश्वातून सतत एकामागून एक दुःखद घटना समोर येत आहेत. याचं दुःखद घटनांमध्ये आता एक आणखीन मोठी धक्कादायक घटना घडली आहे. एका कवयीत्रीचा ऑनलाईन लाईव्ह कार्यक्रम सुरू असताना मृत्यू झाला आहे. कवयित्री माधुरी गयावळ यांचे 28 जुलै रोजी वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले आहे.
आजवर त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत तसेच त्यांना चाली देखील लावल्या आहेत. त्यांचा आवाज देखील अतिशय सुमधुर होता. त्यामुळे एका ऑनलाइन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांना करण्यास सांगितले होते. हे सूत्रसंचालन करत असताना त्यांना मध्येच मोठा ठसका लागला. आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. काही तासांपूर्वी सर्वांसमोर धडधडीत सूत्रसंचालन करत असलेली महिला दुसऱ्याच क्षणी मृत्युमुखी पडली. ही माहिती ऐकून सदर कार्यक्रमातील व्यक्ती हादरून गेल्या.
‘आम्ही सिद्ध लेखिका’ या संस्थेने ‘मल्हार धून’ नावाचा काव्य संमेलनाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमांमध्ये अनेक कवी मंडळी सहभागी झाली होती. याच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री माधुरी करत होत्या. त्यांनी सुरुवातीला काही मान्यवरांची नावे घेतली. मान्यवरांनी त्यांच्या कविता देखील सादर केल्या. त्यानंतर पुन्हा त्या काही मान्यवरांची नावे घेऊ लागल्या. त्याचवेळी त्यांना मोठा ठसका लागला. उपस्थित व्यक्तींनी त्यांना पाणी पिऊन या असे सांगितले. मात्र त्या पाणी प्यायला गेल्यानंतर पुन्हा आल्याच नाही.
त्यामुळे सर्वजण चिंतेत होते. सदर संमेलनातील एका व्यक्तीने फोन करून त्यांच्या घरी विचारले तेव्हा समजले की त्यांचे निधन झाले आहे. संमेलनातील प्रत्येक व्यक्तीसाठी हाय खूप मोठा धक्का होता. अनेक व्यक्ती त्यांच्या निधनामुळे आता हळहळ व्यक्त करत आहेत. माधुरी या एक उत्तम कवयित्री तर होत्याच त्याचबरोबर त्या उत्तम चित्रकार देखील होत्या.
त्यांच्या कलेमुळे त्यांची प्रसिद्धी खूप मोठी होती. त्यांच्या पश्चात्त पती, मुलगा, सून व नात असा परिवार आहे. माधुरी गयावळ या ‘आम्ही सिद्ध लेखिका’ संस्थेच्या सचिव होत्या. तसेच त्या साहित्यदीप प्रतिष्ठानशी देखील जोडलेल्या होत्या. ‘मनांगण’ हा त्यांचा काव्यसंग्रह खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूबद्दल कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच चाहते देखील त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.