क्रिकेट विश्वात शोककळा! प्रसिध्द अंपायरचे निधन; ३००हून अधिक सामन्यांमध्ये बजावली होती पंचाची भूमिका

दिल्ली | क्रिकेट विश्वाला एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. प्रसिध्द माजी क्रिकेटर आणि अंपायर असद रउफ यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांचे आंतराष्ट्रिय क्रिकेट विश्वात मोठ योगदान होत.
त्यांनी ३००हून अधिक सामन्यांमध्ये पंचाची भूमिका साकारली होती. मात्र त्यांच्या अशा अचानक जाण्याने क्रिकेट विश्व हादरलं आहे. ते पाकिस्तानी क्रिकेट मधील मोठा चेहरा म्हणून देखील ओळखले जायचे. त्यांनी त्यांच्या करिअर मध्ये अनेक बडे सामने खेळले आहेत.
त्यानतंर राजीनामा देऊन अंपायर होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आंतराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट मध्ये त्यांना पंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या अचानक जाण्याने पाकिस्तान क्रिकेटवर शोककळा पसरली आहे.
त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांची प्राणज्योत मावळली असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे. अनेक दिग्गज खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली बनले आहेत. अशी खदखद त्यांच्या मृत्यू नंतर व्यक्त केली जात होती.