क्रिकेट विश्वात शोककळा! दिग्गज पाकिस्तानी क्रिकेटरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 36व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट क्षेत्रातील अनेक दिग्गज खेळाडूंचा मृत्यू होत आहे. आज देखील अशाच एका दिग्गज खेळाडूचा मृत्यू झाला आहे. त्याला हृदयविकाराचा झटका आला, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या वेळी त्याचे वय 36 वर्ष होते. तो एक all-rounder म्हणून ओळखला जायचा.
पाकिस्तान मधील शहजाद अजम राणा याचे निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत. वयाच्या 36 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला आहे.
तो एक चांगला बॉलर आणि बॅट्समन म्हणून ओळखला जायचा. त्याला आंतराष्ट्रीय क्रिकेट मध्ये संधी मिळाली नाही. मात्र तो देशांतर्गत होत असलेल्या अनेक सामन्यांमध्ये खेळला आहे. त्याने प्रथम श्रेणीत 95 सामने खेळले त्यात तो 1495 रण करू शकला. तसेच T 20 क्रिकेट मध्ये त्याने 29 सामने खेळून 27 विकेट काढल्या आहेत.
तसेच त्याने लिस्ट ए क्रिकेट मध्ये 58 सामने खेळले त्यात त्याने 81 विकेट्स झळकावल्या, तो एक फास्टर बॉलर होता. त्याला लवकरच मोठ्या क्रिकेट मध्ये संधी मिळणार होती. मात्र अचानक त्याचे निधन झाले आहे. एवढ्या कमी वयात त्याचे निधन झाले तरी कसे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.