अभिनय क्षेत्रात शोककळा! ‘मला माफ करा…’ चिठ्ठी लिहून प्रसिध्द अभिनेत्रीची आत्महत्या

मुंबई | अभिनय क्षेत्रात कोणाला नाव कमवायचे असेल तर पहिली मुंबई गाठावी लागते. मुंबईत काम करून अभिनय क्षेत्रासाठी झटाव लागत आणि त्यानंतर छोट्या मोठ्या कार्यक्रमात रोल मिळतो. आणि अभिनयावर तुमची पुढील दिशा ठरते. मुंबई जेवढी स्वप्न सुंदरी आहे. तेवढीच धोकादायक देखील असल्याचा प्रत्यय आला आहे.

Join WhatsApp Group

 

एका 30 वर्षीय महिला कलाकाराने हॉटेल मधील एका रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यात ती जागीच ठार झाली आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. 30 वर्षीय मॉडेल आकांशा मोहन हिने आत्महत्या केली आहे.

 

ती अंधेरी मधील चार बंगला परिसरात राहत होती. तिने मृत्यू पूर्वी एक चिठ्ठी लिहली आणि आत्महत्या केली आहे. अभिनयाचे वेड असलेली मॉडेल मुंबईत आली आणि मॉडेल बनली, अनेक शो मध्ये तिने चांगला परफॉर्म केला. आणि अनेक नामांकने जिंकली. मात्र आयुष्याच्या स्पर्धेत खुपच लवकर हारली.

 

तिने एका हॉटेल मध्ये एक रूम भाड्याने घेतली आणि त्या हॉटेल मध्येच आत्महत्या केली. गळफास घेऊन तिने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. तिने मृत्यू पूर्वी काही तास आधी जेवण देखील ऑर्डर केले होते. आणि त्यानंतर “माफ करा. यासाठी कोणीही जबाबदार नाहीये. कुणालाही त्रास देऊ नका. मी खुश नाहीये. मला फक्त शांती पाहिजे.” अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button