साऊथ सिनेसृष्टीत शोककळा! आणखी एका प्रसिध्द निर्मात्याचे निधन; कमल हसन हळहळले

दिल्ली | साऊथ चित्रपट सृष्टीला कोणाची नजर तर लागली नाही ना? असा थेट सवाल व्यक्त केला जात आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून इंडस्ट्री मधील अनेक दिग्गज कलाकार या जगाला कायमच सोडून गेले आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

काही दिवसांपूर्वी महेश बाबू यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे साऊथ चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली होती. ते एक चांगले अभिनेते म्हणून देखील ओळखले जायचे. त्यांच्या निधनाची बातमी ताजी असताना आणखी एका दिग्गज निर्मात्याच्या निधनाने पुन्हा चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Advertisement

 

साऊथ फिल्म इंडस्ट्री मधून एक शोक व्यक्त करणारी बातमी समोर आली आहे. गेल्या दोन दिवसापूर्वीच एका प्रसिद्ध निर्मात्याचे निधन झालं आहे. तामिळनाडू येथे राहणारे के मुरलीधरन यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनावर सर्वांनी शोक व्यक्त केला आहे.

Advertisement

 

हृदयविकाराच्या झटक्याने के मुरलीधरन यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या जाण्याने साऊथ इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर दिगज्ज अभिनेते कमल हसन यांनी ही श्रद्धांजली वाहिली आहे. के मुरलीधरन यांनी तमिळ निर्माता परिषदेवर अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.

 

मुरलीधरन यांनी लक्ष्मी मूव्ही मेकर्स हे प्रोडक्शन चालू केले होते. या लक्ष्मी मूव्ही मेकर्स मध्ये अंबे शिवम, पुधुपेटाई तसेच बागवती असे चित्रपट तयार झालेत. तसेच त्यांनी या माध्यमातून अनेक नवीन कलाकारांना संधी देऊन त्यांच्या मधील कला शोधली आहे. ते एक चांगले निर्माते म्हणून देखील ओळखले जात होते.

 

कमल हसन हळहळले – कमल हसन म्हणले की के मुरलीधरन यांनी लक्ष्मी मूव्ही मेकर्स मधून अनेक चित्रपट निर्माण केले. परंतु तुम्हीच आता नाहीत. प्रिय शिवा मला ते दिवस आठवतात. त्यांना श्रद्धांजली. अशी पोस्ट करून त्यांनी मुरलीधरन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

‘सकलकला वल्लवन ‘हा लक्ष्मी मूव्ही मेकर्स चा 2015 साली झालेला सर्वात शेवटी चित्रपट होता. या चित्रपटामध्ये त्रिशा अंजली आणि जयम रवी यांनी मुख्य पात्राची भूमिका केली होती. मुरलीधरन यांच्या निधनाने अनेक दिग्गज कलाकार देखील हादरले आहेत.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *