बॉलीवूडवर शोककळा! सलमान खानच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन; 24 तास राहत होते एकमेकांच्या सोबत, भाईजान हळहळला

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड मधील अनेक दिग्गज कलाकार जगाचा निरोप घेत आहेत. 2021 आणि 2022 या दोन वर्षात अनेक दिग्गजांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्राला झालंय तरी काय? असा थेट सवाल व्यक्त केला जात आहे. बॉलीवुड असो वा मनोरंजन विश्व दोन्ही कडील कलाकार आज जगाचा निरोप घेताना पाहायला मिळत आहेत.
नुकतेच बॉलीवुड मधील प्रसिध्द अभिनेते राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत मावावळली, त्यांच्या निधनाने पूर्ण देशावर शोककळा पसरली होती. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक दिवस रुग्णालयात उपचार घेऊन देखील त्यांची प्रकृती सुधारली नाही. आणि अखेर त्यांचे निधन झाले आहे.
राजू श्रीवास्तव यांच्या नंतर आणखी एका दिग्गजाच्या निधनाने बॉलीवुड हादरलं आहे. दिवसातून अनेक तास सलमान खान सोबत राहणाऱ्याचे निधन झाले आहे. याबाबत स्वतः सलमान खान याने पोस्ट लिहून माहिती दिली आहे. सलमान खान याचा बॉडी गार्ड सागर पांडे यांचे निधन झाले आहे.
राजू श्रीवास्तव यांच्या प्रमाणेच तो देखील जिम मध्ये व्यायाम करत होता. त्यानंतर अचानक त्याच्या छातीत दुःखु लागले आणि यातच त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता.
डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सागर पांडे हा मृत्यू वेळी 50 वर्षाचा होता. त्याचे लहान पणापासून अभिनेता बनण्याचे स्वप्न होते. मात्र तो अभिनेता बनू शकला नाही. त्यामुळे त्याने बॉडी डबल होण्याचं ठरवलं आणि त्याने अनेक दिग्गज कलाकरां सोबत काम केले आहे. त्याच्या मृत्यू नंतर सलमान खान देखील हळहळला आहे.
सागर याच्या अचानक झालेल्या निधनामुळे अनेक दिग्गज लोकांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. सलमान खान याने देखील एक पोस्ट लिहली आहे. त्यात तो भावूक होऊन म्हणाला की “माझ्यासोबत कायम असल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. सागर भाऊ तुझ्या आत्म्याला शांती लाभो. धन्यवाद’