बॉलिवुडवर शोककळा! अभिनेत्री राणी मुखर्जीवर दुःखाचा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन

Mourning Bollywood! Mourning over actress Rani Mukerji; Death of a very close person

मुंबई | गेल्या अनेक दोन वर्षांपासून चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार या जगाचा निरोप घेत आहेत. त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरत आहे. मराठी चित्रपटसृष्टी, हिंदी चित्रपटसृष्टी तसेच बॉलिवुड मधील देखील कलाकार या जगाचा निरोप घेत आहेत.

 

आज आणखी एका दिग्गज कलाकाराच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. गेल्या २ वर्षाच्या कालावधीत लता मंगेशकर, बप्पी लहरी, ऋषी कपूर, इरफान खान, राजू श्रीवस्तव यांच्या सारख्या दिग्गज कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्राला झालंय तरी काय? असा सवाल व्यक्त केला जात आहे.

Advertisement

 

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड मधील कलाकार तसेच काहींच्या नातेवाईकांचे निधन होण्याच्या घटना अधिकच घडू लागल्या आहेत. यामुळे काही कलाकार या प्रसंगाला तोंड देताना दिसतायत. अशीच एक बॉलीवूडमधील अभिनेत्री राणी मुखर्जीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या आजीचं निधन झाल्याची घटना समोर आली आहे. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला आहे.

Advertisement

 

राणी मुखर्जी यांच्या आजीचे नाव आरती मुखर्जी आहे. वयोमानानुसार त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. यामुळे त्यांचं निधन झालं आहे. अभिनेत्रीच्या आजी या देबाश्री रॉय यांच्या आई होत्या. हे फार कमी लोकांना माहित आहे. आज रोजी त्यांचं निधन झाल्याचे समजतय. यामुळे दुखःद वातावरण झालंय. तसेच देबश्री रॉय यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

 

देबश्री रॉय यांनी व्यक्त केला शोक – देबश्री रॉय यांनी त्यांच्या आईबाबत शोक व्यक्त केला आहे. मी आज अभिनेत्री बनले त्याच पूर्ण श्रेय आईला जाते. वयोमानानुसार तिच शरीर थकल होत. तिला इतर कोणताही आजार नसल्याचं त्या म्हणाल्या. त्यांच्या मृत्यूवेळी त्या आपल्या मुलींजवळ होत्या. त्यांच्या जाण्यान मनोरंजन क्षेत्रातील अनेक चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *