बॉलिवूडवर शोककळा! दिग्गज दिग्दर्शकाच्या पत्नीचे निधन
पुणे | बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांचे आयुष्य एका रात्रीत बदलून जाते. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी एका चित्रपटातून रातोरात मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. एकाच चित्रपटामधून ते प्रसिद्ध झोतात आले आहेत तसेच त्यांनी मोठा चाहता वर्ग कमावला आहे.
कोणत्याही क्षेत्रामध्ये यश कमावण्यासाठी वेळ द्यावा लागतो. अशात एका रात्रीत मिळवलेली प्रसिद्धी ही लवकरच संपून जाते. मात्र प्रचंड मेहनत करून मिळवलेले यश हे चिरकाळ आपल्या सोबत राहते. तसेच आपण मेहनत सातत्याने करत राहिलो तर आपल्यापासून आपले यश कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
मात्र असे असले तरी बॉलीवूडमध्ये अनेक वेगवेगळ्या घटना घडत असतात. इथे नावारूपाला आलेला प्रत्येक व्यक्ती प्रसिद्ध झोतात भारावून जातो. प्रचंड संपत्ती आणि आर्थिक दृष्ट्या प्रबळ होऊन कलाकारांना वेगवेगळे छंद लागतात. हे छंद जोपासत त्यांच्याकडे असलेले सर्व पैसे संपून जातात.
अथवा त्यांना ते व्यवस्थित वापरता येत नाहीत. या सर्वांमध्ये ज्यावेळी त्यांच्यावर दुःखाचा काळ येतो तेव्हा त्यांच्या मदतीसाठी कोणीच पुढे येत नाही. बॉलीवूड मध्ये आतापर्यंत असे अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले आहेत ज्यांच्या निधनाचा काळ फार वाईट पद्धतीने गेला मात्र बॉलीवूडने त्यांना अजिबात मदत केली नाही.
आज या बातमीतून अशाच एका दिग्दर्शकाची दुखद कहानी जाणून घेणार आहोत. या दिग्दर्शकाने बॉलीवूडमध्ये अनेक प्रसिद्ध चित्रपट घडवले. मात्र आता या दिग्दर्शकावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्वतःच्या पत्नीच्या आजारासाठी व्यवस्थित उपचार करू न शकल्याने त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे.
जवळ पुरेसा पैसा नसल्याने त्यांनी बॉलीवूड कडे हात पसरले मात्र बॉलीवूड कडून त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे या दिग्दर्शकांच्या पत्नीचे निधन झाले. यामुळे ते पूर्णतः खचून गेले आहेत. दुर्दैवी पत्नीचे निधन झालेल्या दिग्दर्शकाचे नाव बी सुभाष आहे.
बी सुभाष हे तेच दिग्दर्शक आहे ते ज्यांनी डिस्को डान्सर मधून मिथुन चक्रवर्तीला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. बी सुभाष दिग्दर्शित डिस्को डान्सर या चित्रपटांमध्ये मिथुन चक्रवर्तीने प्रथमच बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये दमदार अभिनय करून मिथुन दा मोठ्या प्रसिद्ध झोतात आला. बी सुभाष यांच्या या चित्रपटामुळे त्याला मिळालेल्या प्रसिद्धीचे त्याने नेहमीच दिग्दर्शकांकडे आभार व्यक्त केले. त्यानंतर मिथुन दा कडे अनेक बिग बजेट असलेल्या चित्रपटांची रांग लागली.
बी सुभाष यांच्या पत्नीचे नाव तलोदमा असे होते. काही दिवसांपूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना किडनीचा आजार झाला होता. त्यांचा मृत्यू होण्याआधी डॉक्टरांनी सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या या आजाराचे निदान केले होते. किडनीचा आजार झाल्यानंतर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
या उपचारादरम्यान त्यांच्या वरती प्रचंड खर्च झाला. बी सुभाष यांच्याकडे असलेले सर्व पैसे त्यांनी पत्नीच्या आजारपणासाठी वापरले. मात्र त्यांच्या पत्नीचा आजार काही केल्या बरा होत नव्हता. उपचारासाठी त्यांना अधिक पैशांची गरज होती. त्यांनी बॉलीवूड कडे देखील पैसे मागितले. मात्र यावेळी त्यांच्या मदतीसाठी एकही हात पुढे आला नाही. पत्नीचे निधन झाल्यानंतर ते आता फार दुखी आहेत. तसेच बॉलीवूड कडून मिळालेल्या वागणुकीबद्दल खंत व्यक्त करत आहेत.