बॉलीवूडवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन; चित्रपटसृष्टी पुन्हा हादरली

मुंबई | बॉलिवूड सृष्टीतून सध्या एका पाठोपाठ अतिशय दुःखद बातम्या समोर येत आहे. जणू काही बॉलिवूडला कोणाची गरजच लागली आहे. 2022 या वर्षात अनेक संगीतकार तसेच अनेक अभिनेते दिग्दर्शक व क्रीडा क्षेत्रातील लोकांनी जगाचा निरोप घेतला आहे. अशात बॉलिवूड मधून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक इस्माइल श्रॉफ यांचं निधन झालं आहे. इस्माइल हे अनेक महिने झाले आजारी होते. इस्माइल यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. माहितीनुसार, 29 ऑगस्ट रोजी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. तेव्हापासून त्यांच्या शरीराच्या उजव्या भागाने काम करणे बंद केले आणि त्यांना बराच काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आंध्र प्रदेशचे रहिवासी:
बॉलीवूड चित्रपटांचे दिग्गज दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले. एका कौटुंबिक मित्राने ही माहिती दिली. ते सुमारे 65 वर्षांचे होते आणि त्यांनी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते आंध्र प्रदेशचे होते.