आत्ताच्या घडामोडी

मिथुन चक्रवर्ती रूग्णालयात दाखल; चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण, नेमकं काय झालं?

दिल्ली | दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना देखील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे चाहता वर्ग चांगलाच चिंतेत पडला आहे.

 

मिथुन यांनी अनेक चित्रपटात काम करून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. शिवाय त्यांनी राजकारणात देखील मोठी ओळख निर्माण केली आहे. त्यांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे.

 

त्यामुळे अचानक त्यांचे रुग्णालयातील फोटो व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. एका भाजपाच्या कार्यकर्त्याने सदर फोटो मोबाईल मध्ये काढून सोशल मीडियावर पोस्ट केल्याची माहिती समोर आली आहे.

 

त्यामुळे मिथुन यांना कशामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यांच्या पोटामध्ये अचानक दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

त्यांना रुग्णालयात दाखल केले त्यावेळी त्यांना ताप देखील होता. गेल्या काही तासात अचानक पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र डॉक्टरांनी औषध देऊन त्यांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button