आत्ताच्या घडामोडी

Fact Check | मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खरंच गंभीर आहे का?

दिल्ली | गेल्या काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अचानक मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत बिघडल्यामुळे चाहत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

मिथुन यांचे रुग्णालयातील काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, त्यामुळे चाहत्यांना मोठा झटका बसला आहे. चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. एका व्हायरल मेसेज मध्ये मिथुन चक्रवर्ती हे सिरियस असल्याचा दावा केला जात आहे.

 

आणि त्यांच्या रुग्णालयातील फोटो सोबत हा व्हायरल मेसेज पसरवला जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अनेक चाहत्यांनी यावर कॉमेंट करून मिथुन हे लवकर बरे व्हावेत यासाठी देवाकडे प्रार्थना करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

मात्र याबाबत आम्ही मेसेज ची पडताळणी करून सत्य समोर आणण्याचा एक प्रयत्न केला आहे. व्हायरल होत असलेला मेसेज खोटा आहे. मात्र त्या सोबत असलेले फोटो खरे आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मिथुन यांच्या पोटात अचानक दुखू लागले.

 

त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने संबंधित फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. मिथुन यांना रूग्णालयात दाखल केल्यावर त्यांना थोडासा ताप देखील होता.

 

मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी औषध उपचार करून मिथुन यांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे चाहत्यांनी घाबरु नये, मिथुन हे ठणठणीत आहेत. तसेच कोणीही कोणत्याही स्वरूपाच्या अफवा पसरवू नये असे आवाहन केले जात आहे.

 

त्यांचं निधन झाले असल्याचे बॅनर्स देखील सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. मात्र ते बॅनर्स पूर्णपणे खोटे आहेत. त्या बॅनर्स मध्ये भावपूर्ण श्रद्धांजली चे स्टिकर देखील लावलेले पाहायला मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button