मराठी चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिध्द मराठी अभिनेत्रीचे निधन; १००हून अधिक चित्रपटात साकारली होती भूमिका

पुणे | मराठी मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. एका दिग्गज अभिनेत्रीने या जगाचा निरोप घेतला आहे. या अभिनेत्रीने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीमध्ये देखील मोठी कामगिरी केली. अभिनेत्रीने अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले होते. मराठी सिनेसृष्टी मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दिग्गज कलाकारांचे निधन होत असल्याचे दिसत आहे.

 

काही दिवसांपूर्वी दिग्गज अभिनेते अरविंद धनु यांनी या जगाचा निरोप घेतला. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये अरविंद यांनी दमदार अभिनय केला होता. या मालिकेत त्यांनी शालिनीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या मालिकेबरोबरच अरविंद धनु यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांना ब्रेन स्टोक झाल्याचे देखील म्हटले जाते.

 

त्याचबरोबर प्रदीप पटवर्धन या दिग्गज अभिनेत्याने देखील या जगाचा निरोप घेतला. प्रदीप पटवर्धन यांनी त्यांच्या कारकिर्दीत लावू का लाथ, नवरा माझा नवसाचा बायको असून शेजारी, लग्नाची बेडी, टूर टूर, मोरूची मावशी अशा अनेक चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला.

 

प्रदीप पटवर्धन यांचा अभिनय अतिशय भारदस्त असायचा. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने मोरूची मावशी हे नाटक गाजवले होते. अनेक चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री तसेच आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे निधन झाले आहे. वत्सला यांनी अनेक चित्रपटांमध्ये मराठमोळ्या भूमिका साकारल्या.

 

काष्टी साडी नेसून मराठमोळा साज करत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपली छाप उमटवली. वृद्धापकाळाने त्यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. 12 मार्च रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी अभिनय क्षेत्रात मोठा दुःखाचा डोंगर कोसळला.

 

अभिनयाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते. प्रसिद्ध नाट्य कलाकार श्रीधरपंत देशमुख यांच्या त्या कन्या होत्या. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची रुची होती. वत्सला यांनी “जल बिन मछली नृत्य बीन बिजली” या चित्रपटामध्ये धडाकेबाज अभिनय केला होता.

 

माय माऊली आणि नागपंचमी अशा प्रसिद्ध चित्रपटांमध्ये देखील त्या झळकल्या. सुहाग आणि अजब तुझे सरकार या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी अभिनय केला होता. मराठी सिनेसृष्टीसह त्यांनी बॉलीवूड देखील चांगलेच गाजवले. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वात आणि बॉलीवूडमध्ये दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button