मराठी चित्रपसृष्टी हादरली! प्रसिध्द कलाकाराचे निधन; पाण्याच्या त्या घोटाने घेतला बळी

दिल्ली | मराठी मनोरंजन विश्वातून एका मागोमाग एक दुःखद घटना घडतच आहेत. यामुळे मराठी मनोरंजन विश्वाला कुणाची नजर लागली आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण मराठी सिने विश्वातील अनेक कलाकार या जगाचा निरोप घेत आहेत. यामध्ये कवयित्री आणि लेखिका माधुरी गयावळ यांनी देखील या जगाचा निरोप घेतला आहे.

 

वयाच्या 58 व्या वर्षी या कवयित्रींनी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांच्या मृत्यूची चर्चा जोरदार रंगली आहे. त्यांचा मृत्यू हा अनेकांना धक्का देणारा होता. कारण थोड्याच वेळापूर्वी त्या एका कार्यक्रमात सूत्रसंचालन करत होत्या. इथे त्या पाणी प्यायला गेल्या आणि परत आल्याच नाहीत. परत आली ती त्यांच्या निधनाची बातमी. यामुळे कार्यक्रमातील सर्वच व्यक्ती ढसाढसा रडू लागल्या. माधुरी या एक उत्तम कवियत्री लेखिका आणि चित्रकार देखील होत्या. त्यांचा मनांगण हा काव्यसंग्रह संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आहे.

 

नियती कधी कोणता कसा खेळ खेळले याबद्दल कुणालाच काही सांगता येत नाही. असंच काहीसा खेळ माधुरी यांच्याबरोबर देखील घडला. आम्ही प्रसिद्ध लेखिका ही एक मोठी संस्था आहे. या संस्थेअंतर्गत कवी प्रेमींसाठी काव्य वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम माधुरी यांच्यासाठी घातक ठरला. याच कार्यक्रमात सूत्रसंचालन करत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

 

सदर कार्यक्रमा ऑनलाईन पद्धतीचा होता. त्यामुळे त्या घरातून या कार्यक्रमाला हजर झाल्या होत्या. सर्व कवी प्रेमी देखील येथे उपस्थित होते. यावेळी त्यांनी सूत्रसंचालन करून काही व्यक्तींना कविता वाचण्यास आमंत्रित केले. दोन-तीन व्यक्तींच्या कविता वाचून झाल्या होत्या. पुढील व्यक्तीला काव्यवाचनासाठी बोलावत असताना त्यांना जोरात ठसका लागला. हा ठसका इतका जोरात होता की त्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. त्यामुळे कार्यक्रमातील एका व्यक्तीने त्यांना पाणी पिऊन या असे सांगितले.

 

यावेळी त्या घरातील किचनमध्ये आल्या, पाण्याचे ग्लास त्यांनी हातात घेतले मात्र पाणी न पिताच त्या जमिनीवर कोसळल्या. यावेळी घरातल्या सदस्यांनी लगेचच त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात नेई पर्यंत त्यांचे निधन झाले होते. या घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि सर्वजण हळूहळू व्यक्त करू लागले.

 

पाणी प्यायला गेलेल्या माधुरी बराच वेळ झाला आल्या नाहीत त्यामुळे या कार्यक्रमातील एका व्यक्तीने त्यांच्या घरी फोन केला त्यावेळी त्यांचे निधन झाल्याचे समजले. माधुरी यांच्या निधनाने अनेक कवी प्रेमी तसेच लेखक आणि चित्रकार यांच्यावर दुःखाची लाट पसरली आहे. माधुरी या एक उत्तम चित्रकार देखील होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button