मराठी कलाविश्वात शोककळा! प्रसिध्द महिला कलाकाराचे निधन; १ वर्षाचा चिमुकला अनाथ

सातारा | गेल्या काही दिवसांपासून कला विश्वातील अनेक दिग्गज कलाकार जगाचा निरोप घेत आहेत. २०२२ या वर्षांत अनेकांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे हे वर्ष कला विश्वासाठी धोक्याचे असल्याचे म्हटले जात आहे.
या वर्षात दिग्गज गायिका लता मंगेशकर, अभिनेते रमेश देव यांनी जगाचा निरोप घेतला आहे. यांच्या बरोबर शेकडो कलाकारांनी अलविदा केला आहे. त्यामूळे अभिनय क्षेत्राला झालंय तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
अशाच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आणखी एका मराठी कलाकाराचे निधन झाले आहे. त्यामुळे कला विश्वात शोककळा पसरली आहे. राजश्री अरुण मोहिते असे या कलाकाराचे नाव आहे.
सोशल मीडियावर राजश्री ही अत्यंत लोकप्रिय बनली होती. तिचे हजारोंच्या संख्येत चाहता वर्ग होता. कोरोनाच्या काळात तिच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर तिच्या आयुष्यात खूप वाईट प्रसंग आले, उपजीविकेला कोणतंही साधन उरले नाही.
त्यामुळे तिने यूट्यूब चॅनलची निर्मिती केली आणि त्यावर दैनंदिन ब्लॉग टाकायला सुरुवात केली, रसिकांनी अक्षरशः काही काळातच तिला डोक्यावर घेतलं. तिची यूट्यूब च्या माध्यमातून उपजीविका भागू लागली.
यात ती फेसबुक आणि यूट्यूब च्या माध्यमातून अतिशय लोकप्रिय झाली, तिचा एक वेगळा चाहता वर्ग बनला. मात्र काळाने अखेर तिच्यावर घाला घातला. तिला १ वर्षाचं बाळ आहे. त्याला ती पोरकी करून गेली आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी तिला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला. त्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यातून ती कशीबशी सावरली मात्र त्यानंतर तिला अटॅक आल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. तिच्या जाण्याने १ वर्षाचं चिमुकलं बाळ पोरक झालं.
मात्र तिने तिच्या हजारो चाहत्यांना रडवल आहे. अनेक चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच अनेक दिग्गजांनी व्हिडिओ आणि ऑडियो बनवून तिला श्रद्धांजली वाहिली आहे.