उषा यांचा मुलगा दिसतो खुपचं देखणा; करतो हे काम, राहतो अत्यंत साधा

मुंबई | मराठी सिनेसृष्टीत आजवर अनेक खतरनाक खलनायिका होऊन गेल्या मात्र उषा नाडकर्णी यांच्या सारखी खाष्ट खलनायिका अजून झालीच नाही. उषा यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपट आणि मालिका खूप गाजवल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. आजही त्या अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत.
उषा यांचा जन्म १३ सप्टेंबर १९४६ रोजी झाला. त्या आता ७५ वर्षांच्या झाल्या आहेत. मात्र तरी देखील त्यांच्यातला ताठरपणा कायम आहे. चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांना सगळेच घाबरत होते. अशात त्यांच्या खऱ्या आयुष्यात देखील अनेक व्यक्ती त्यांना पाहून चळचळ कापतात.
उषा यांनी आजवर अनेक मालिका चित्रपट आणि नाटकांमध्ये देखील काम केले आहे. माहेरची साडी या चित्रपटात त्यांनी धडाकेबाज अभिनय केला होता. सिंहासन या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा अभिनय केला. त्यानंतर प्रतिघात, सडक छाप, धुमाकूळ या चित्रपटात देखील त्यांच्या अभिनयाची छाप पाहायला मिळाली. निष्पाप, सतरंज, यशवंत, वास्तव, पक पक पकाका अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. नुकत्याच त्या अदृश्य या चित्रपटात देखील झळकल्या होत्या.
उषा यांनी रिशत्ये या मालिकेत पहिल्यांदा अभिनय केला. त्यानंतर थोडीसी जमीन थोडासा आसमान, विरुद्ध या मालिका त्यांनी गाजवल्या. अशात पवित्र रिश्ता ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेली मालिका आहे. त्यानंतर त्या रिष्तो का मेला, खुलता काळी खुलेना, मोलकरीण बाई मोठी तिची सावली या मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे.
उषा या बिग बॉसच्या पहिल्या सीजनमध्ये देखील दिसल्या होत्या. अशात उषा नाडकर्णी यांना संपूर्ण सिने विश्वात आवू या नावाने ओळखले जाते. त्यांचा मुलगा त्यांना या नावाने हाक मारायचा. त्यांच्या मुलाचे नाव अभिजीत नाडकर्णी असे आहे. तो सोशल मीडियावर तितकासा सक्रिय नसतो. मात्र त्याचे काही फोटो सोशल मीडियावर आहेत. या मध्ये तो खूप हँडसम दिसतो आहे.