आत्ताच्या घडामोडी

चित्रपटसृष्टी हळहळली! दिग्गज मराठी अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे | गेल्या काही दिवसांपासून भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार जगाचा निरोप घेताना पाहायला मिळत आहेत. रमेश देव, लता मंगेशकर, बप्पी लहरी यांच्या सारख्या दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे.

 

त्यामुळे चित्रपट सृष्टीत एकच खळबळ उडाल्याची पाहायला मिळत आहे. आज आणखी एक मोठा धक्का मराठी चित्रपट सृष्टीला बसला आहे. एका दिग्गज अभिनेत्रीचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यामुळे मराठी कला विश्वात शोककळा पसरली आहे.

 

अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन झाले आहे. त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांच्या सारख्या दिग्गज लोकांसोबत भूमिका साकारून लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होत. प्रेमा यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीला मोठा धक्का मानला जात आहे.

 

गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेमा यांच्या मुलाचा देखील मृत्यू झाला होता. त्यामुळे त्या एकट्या पडलेल्या देखील पाहायला मिळाल्या, प्रेमा एक कलाकार नव्हत्या तर त्या एक निर्मात्या देखील होत्या. त्यांनी उतावळा नवरा या चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे.

 

त्यांनी काही दिवसांपुर्वी दे दणादण या चित्रपटातील गमती आणि जमती एका कार्यक्रमात सांगून दाखविल्या होत्या. त्या कार्यक्रमामुळे त्या काही काळ खूपच चर्चेत आल्या होत्या. प्रेमा एक वरिष्ठ अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या.

 

त्यांनी मी तुळस तुझ्या अंगणी, खेळ आयुष्याचा, सासरची साडी, दे दणादण, गडबड घोटाळा, धूमधडाका, कुंकू झाले वैरी या सारख्या दिग्गज चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button