मराठी चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिध्द अभिनेत्याचे निधन; 47व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांचे मृत्यू होताना पहायला मिळत आहे. अनेकांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. यात आता पुन्हा एक भर पडली आहे. बॉलीवुड बरोबर मराठी चित्रपट सृष्टीतील एका दिग्गज कलाकाराचा मृत्यू झाला आहे.
प्रसिध्द मराठी अभिनेत्याचे निधन झाले आहे. त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं! ही मालिका अवघ्या काही दिवसातच घराघरात पोहोचली आहे. या मालिकेने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. TRP च्या बाबतीत ही मालिका काही दिवस अव्वल स्थानी होती.
त्यामधील कलाकारांच्या कलेने आज या मालिकेला विशेष यश मिळाले आहे. मात्र या मालिकेच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. या मालिकेतील प्रसिद्ध कलाकाराचे निधन झाले आहे. त्यामुळे मालिकेच्या चाहत्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
या मालिकेत काम करत असलेले प्रसिध्द अभिनेते अरविंद धनु यांनी अवघ्या ४७व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यात त्यांना अधिक त्रास होऊ लागला.
आणि त्यात त्यांना ब्रेन स्ट्रोकचां झटका आला. आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली होती. त्यांनी यापूर्वी अनेक मराठी छोट्या पडद्यावर काम केले होते. यात क्राईम पेट्रोल, लेक माझी लाडकी अशा मालिकांमध्ये भूमिका साकारली होती.
एक होता वाल्या या चित्रपटात देखील ते झळकले होते. त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. त्यानंतर अनेक दिग्गजांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे. मराठी चित्रपट विश्वाला हा मोठा धक्का देखील मानला जात आहे.