अभिनेत्री हृता दुर्गुळेने केलं लग्न; लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

पुणे | मराठी अभिनय क्षेत्रातील क्रश ऋता दूर्गुळे या मराठ मोळ्या अभिनेत्रीने विवाह केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठी कला विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी लग्नगाठ बांधली आहे. 2022 या वर्षात कलाकारांनी लग्नाचा धूमधडाका सुरू केला आहे.

 

ऋता ने प्रतीक शाह यांच्या सोबत विवाह गाठ बांधली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ऋता ही मराठी मनामनामध्ये बसलेली एक लोकप्रीय अभिनेत्री आहे.

 

तिने फुलपाखरू या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. या मालिकेला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि ऋता दुर्गुले या अभिनेत्रीचे पूर्ण आयुष्य बदलून गेलं. कालपासून तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

 

गेल्या काही महिन्यांपासून तिच्या लग्नाची चर्चा रंगत होती. त्यामुळे ती कधी लग्न करणार? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. मात्र अखेर तिने लग्न केले आहे. लग्नाचे फोटो खुद्द तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button