आत्ताच्या घडामोडी

अभिनेता अंकुश चौधरीच्या गाडीला अपघात; थोडक्यात बचावला?

अहमदनगर | अनेक चित्रपटात काम करून लाखोंच्या हृदयावर राज्य करणाऱ्या अंकुश चौधरीच्या गाडीला अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी हा अपघात झाला आहे. अंकुश याच्या बरोबर दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या गाडीला देखील अपघात झाला आहे.

 

राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील सभेला जाण्यासाठी ते निघाले होते. त्यावेळी अंकुश चौधरी आणि केदार शिंदे हे दोन्ही सोबत होते. त्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला. सुदैवाने यात कोणाला गंभीर दुखापत झाली नाही.

 

मात्र 3 ते 4 गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुण्यावरून अहमदनगर मध्ये कार्यकर्त्यांशी भेट घेऊन औरंगाबाद च्या दिशेने जात असताना नेवासा – घोडेगाव रस्त्यावर हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

अपघात झाल्यानंतर गाड्या औरंगाबाद च्या दिशेने सुरू झाल्या, गाड्यांचा वेग कमी असल्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. त्यामुळे सगळेच थोडक्यात बचावले असल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button