‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतून ही प्रसिध्द अभिनेत्री घेणार कायमचा ब्रेक; धक्कादायक कारण आले समोर

पुणे | छोट्या पड्यावर चालणाऱ्या अनेक मालिकांमुळे प्रेक्षक वर्गाचे चांगलेच मनोरंजन होत आहे. दिवसभरातील कामे लवकर आटपून, तसेच रात्रीची कामे लवकर करून प्रेक्षक मालिका पाहण्यासाठी टीव्ही समोर बसत आहेत.

 

आणि आवडत्या मालिका पाहत असतात. अशीच एक मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनावर घर करून राहिली आहे. मराठी प्रेक्षकांनी अक्षरशः या मालिकेला डोक्यावर घेतलं आहे. या मालिकेचे नाव आहे मन उडू उडू झालं.

 

या मालिकेत मुख्य भूमिकेत हृता दुर्गुळे दिसत आहे. या मालिकेत तिने दिपू या पात्राची भूमिका साकारली आहे. प्रेक्षक वर्गाला तिची वर्गाला तिची भूमिका अत्यंत भावत आहे. तिच्या भूमिकेमुळे लाखो चाहते ही मालिका आवडीने पाहत आहेत.

 

मात्र दिपू च्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिपू ही मालिका सोडनार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. हृताने जर ही मालिका सोडली तर आम्ही मालिका पाहणार नाही, अशा प्रतिक्रिया चाहत्यांमधून उमटू लागल्या आहेत.

 

शुटिंग सेट वर अस्वच्छतेमुळे काही दिवसांपूर्वी हृताचा वाद झाला होता. त्यामुळे ती ही मालिका सोडणार आहे. अशी माहिती मिळत आहे. मात्र तिचा आणि मालिके सोबत करार असल्यामुळे तिला नोटीस परियड करावे लागणार आहे.

 

याबाबत तिने अधिकृत घोषणा केली नाही. मात्र ती ही मालिका सोडण्याचे निश्चित झाले आहे. तीचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले आहे. त्यामुळे ती मालिका तर सोडत नाही ना? अशी चर्चा रंगू लागली आहे. मात्र हृताने मालिका सोडल्यावर निर्मात्यांना मोठा फटका बसू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button