मन उडू उडू झालं मालिकेतील ‘या’ कलाकाराच्या जवळच्या व्यक्तीचे निधन

मुंबई | मन उडू उडू झाले या मालिकेने आतापर्यंत लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. ही मालिका आता लवकरच एक्झिट घेणार आहे. मात्र निरोप घेत असताना आता नुकतेच या मालिकेविषयी एक दुःखद वृत्त समोर आले आहे. मालिकेतील एका अभिनेत्याच्या आईचे दुःखद निधन झाले आहे.

 

मन उडून झालं या मालिकेतील अभिनेता अमित परब याच्या आईचे नुकतेच निधन झाले. 30 जुलै 2022 रोजी त्याच्या आईने या जगाचा निरोप घेतला. त्याच्या आईच्या निधनाने तो आता खूप खचला आहे. मात्र आपल्या मनातील दुःख बाजूला ठेवत त्यांनी मोठ्या ज्ञानी व्यक्ती प्रमाणे आपल्या आईला निरोप दिला आहे.

Advertisement

 

त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने आपल्या आई बरोबर एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच लिहिले आहे की, “प्रत्येक मुलाच्या आयुष्यात आईचे नुकसान नेहमीच दुःखद आणि भरून न येणारे असते. तू दिलेले विचार माझ्यात कायमच राहतील. तू मला गेल्या २८ वर्षात शिकवलेली मूल्ये आणि नैतीक्तेमुळे तू खरी लढाऊ आहेस आणि तू मला तसं व्हायला शिकवलंस.

Advertisement

 

हे सगळं सोपं होण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. मी फक्त देवाच्या इच्छेला सहमती दिली कारण त्याने मला खात्री दिली की त्याने तुझ्यासाठी दुसर्‍या बाजूने आणखी चांगल्या गोष्टींची योजना आखली आहे आणि ते माझ्यासाठी स्वार्थाचे असते जर मी तुला तुझ्या भल्यासाठी तुला जाऊ दिले नसते. मला आनंद आहे की मी काहीतरी बनून दाखवलं.

 

आता मी तुझ्या पुढच्या प्रवासात तुझ्यासोबत असणार नाही म्हणून कृपया स्वतःची काळजी घे. पुरेशी विश्रांती घे. मी माझ्या पुढच्या जन्मातही माझी आई म्हणून पुन्हा भेटण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे आणि मी पुन्हा तुझ्या गर्भात येण्याची आणि तो क्षण अनुभवण्याची प्रतीक्षा करतो. तोपर्यंत कृपया विश्रांती घे. तुझ्याकडून तुला खूप खूप प्रेम.”

 

अमित हा मन उडू उडू झालं या मालिकेत नयन कानविंदे हे पात्र साकारत आहे. तो एका खासगी कंपनीत देखील काम करतो. त्याला अभिनयाची आवड असल्याने त्याने या मालिकेसाठी ऑडिशन दिले होते. ज्यात त्याची निवड नयन या पात्रासाठी केली गेली. मन उडू उडू झालं या मालिकेत नुकतेच दुपू आणि इंद्रा या दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला. आता लवकरच ही मालिका बंद होणार आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *