आत्ताच्या घडामोडी

नाना पाटेकर यांचा मुलगा पाहिलात का? करतो ‘हे’ काम?

पुणे | क्रांतिवीर चित्रपट आला आणि त्या चित्रपटाने नाना पाटेकर यांचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. पहिल्या चित्रपटांत रसिकांच्या मनात घर करून राहणारे नाना पाटेकर सध्या घराघरात पोहचले आहेत.

 

त्यांनी शेकडो चित्रपटात काम करून करोडो लोकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यांनी क्रांतिवीर, नटसम्राट, वेलकम, तिरंगा, परिंदा, प्रहार, अंगार, भूत अशा दिग्गज चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली आहे.

 

त्यांनी मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. काही काळी ते सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जात होते. सध्या देखील ते कायम कोणत्या नी कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात.

 

सध्या देखील ते पुन्हा चर्चेत आले आहेत. ते म्हणजे त्यांचा मुलगा मल्हार याच्यामुळे नाना यांचा तो एकुलता एक मुलगा आहे. मल्हार देखील अभिनय क्षेत्रात नशीब अजमावण्याचा प्रयत्न करत आहे.

 

तो सध्या दिग्दर्शक होण्यासाठी प्रशिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मल्हार हा एका प्रसिध्द दिग्दर्शकांचा असीस्टंट महणून काम करत आहे. येत्या काळात तो देखील मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button