मलायका आणि अर्जुन कपूर करणार लग्न? लवकरच चाहत्यांना देणार ‘गुड न्यूज’

मुंबई | बॉलिवूडमध्ये काय घडतंय काय बिघडत हे सांगता येत नाही. कधी कुणाचा घटस्फोट होतो. तर कधी कुणाचा ब्रेकअप होतो. हे सांगता येत नाही. काही महिन्यांपूर्वी अमीर खानचा 15 वर्षाच्या संसाराच्या तत्वावर घटस्फोट झाला आणि दोघेही विभक्त झाले.

 

बॉलिवूडमधील अनेक कपल्स आहेत या कपल्सपैकी घटस्फोटित अभिनेत्री मलायका आणि तरुण अभिनेता अर्जुन कपूर यांच्या प्रेमसंबंधाबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. काही वर्षांपूर्वी मलायका आणि अरबाज खान यांचा घटस्फोट झाला.

Advertisement

 

आता मलायका आणि अर्जुन हे दोघं सोशल मीडियावर सदैव एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसत आहेत. तसेच मधल्या काळात तर अर्जुनने मलायकाशी विवाह करणार नसल्याच सांगितलं होत. ते दोघंही लव्ह लाईफचा आनंद घेताना दिसत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा विवाह करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Advertisement

 

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दोघेही राहतात – जसा मलायका आणि अरबाज खानचा घटस्फोट झाला. तेव्हापासून मलायका आणि अर्जुन हे दोघं एकत्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in relationship) राहतात. आता मात्र बऱ्याच वर्षानंतर मलायकान अर्जुंनशी विवाह करणार असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सांगितलं आहे. त्यामुळे ते कधी लग्न करणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

 

इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून दिली माहिती – सोशल मीडियावर तिन तिचे लाजरे फोटो अपलोड केले आणि विवाहाबाबत कबुली दिली. याबाबत अनेक चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. ती म्हणाली की होय! मी होकार दिलाय. ही पोस्ट वाचून चाहते हैराण झाले आहेत. ह्या पोस्टचा तर्क वितर्क आता चाहते त्यांच्या विवाहाशी लावू लागले आहेत.

 

याआधी बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांनी आपल्या भविष्यातील प्रोजेक्टसाठी या ट्रिकचा वापर केला होता. पुढील प्रोजेक्ट बाबत माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून द्यायचे त्याचा वापर ते प्रमोशनसाठी करायचा.

 

कॉफी विथ करणमध्ये अर्जुन कपूरला विवाहाबद्दल प्रश्न विचारला असता. तो आपली बहीण सोनम कपूरसमोर अनुत्तरीत झाला होता. एवढं मात्र खर आहे की यामुळे त्याच्या जीवनात बरेचसे सकारात्मक बदल घडून आल्याचं सांगितलं जातय. मलायका आणि अर्जुन कधी लग्न करणार याची उत्सुकता देखील चाहत्यांना लागली आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *