मशरूमची शेती करून लाखो कमवा, असे करा नियोजन

नवी दिल्ली | युवक आणि युवती यांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता, आपल्या आवडीचा एखादा उत्तम व्यवसाय सुरू केला तर, त्यातून आपणास भरपूर आर्थिक फायदा मिळू शकतो. अश्या अनेक व्यवसायांपैकी एक व्यवसाय मशरूम उत्पादन करणे हा आहे. या व्यवसायासाठी केवळ ५० हजार रुपये भांडवलाची गुंतवणूक करून, वर्षाला आपण पाच लाखापर्यंत कमाई करू शकतो.

Join WhatsApp Group

 

शिवाय या व्यवसायासाठी सरकारकडून ४० टक्के अनुदान ही मिळू शकते. आपणास मशरूमच्या व्यवसाय करायचा असेल व त्यातून लाखो रुपयांची कमाई करायची असेल तर, ती आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. अलीकडच्या काळात मशरूमला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. मशरूम तयार करण्यासाठी फार मोठ्या जमीनची आवश्यकता लागत नाही.

 

हा व्यवसाय आपण आपल्या कमीत कमी जागेत, घरी सुद्धा सुरू करू शकतो. या व्यवसायातून आपणास चांगली कमाई मिळू शकते. मशरूम व्यवसाय हा भरपूर फायदा मिळवून देणारा व्यवसाय आहे. मशरूमचा वापर सध्या नियमित आहारामध्ये व वेगळ्या औषधांमध्ये केला जात आहे. याला देशात व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

 

तुम्ही हा व्यवसाय सुरुवातीला फक्त ५० हजार रुपये भांडवल गुंतवून, करू शकतो. यासाठी आपण मशरूमच्या शेतीचे ट्रेनिंग घेऊन हा व्यवसाय सुरुवात करण्यास हरकत नाही. सर्व कृषी विद्यापीठामध्ये आणि शेती संशोधन केंद्रामध्ये, मशरूम उत्पादनाचे प्रशिक्षण दिले जाते. त्याच बरोबर अनेक केंद्र अशी आहेत की ज्यामध्ये मशरूमचे उत्पादन कसे घ्यायचे ? याचे प्रशिक्षण दिले जाते.

 

जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय करायचा असेल तर, योग्य प्रशिक्षणाने सुरुवात करणे योग्य ठरेल. मशरूमच्या व्यवसायासाठी लागणारे भांडवल हे इतर गोष्टीवर अवलंबून असते. तुम्ही हा व्यवसाय ५० हजारपसून सुरू करू शकता.

 

सरकारकडून या व्यवसायासाठी आपणास ४० टक्के अनुदान मिळते. सरकारने मशरूम व्यवसायासाठी कर्जाची सुविधा देखील आपणास उपलब्ध करून दिलेली आहे. या व्यवसायात चांगली कमाई आहे. त्यामुळे मशरूमचा व्यवसाय जगभर विस्तारत आहे. या व्यवसायातून आपण किमान एक ते पाच लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळवू शकतो.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button