आत्ताच्या घडामोडी

महेश मांजरेकरांची मुलगी आहे प्रसिध्द अभिनेत्री, फोटो पाहून वेड लागेल

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीत येऊन प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मराठमोळ्या महेश मांजरेकर यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी फार कमी लोकांना माहीत आहेत. त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टी त्यांनी इतरांसोबत कधी शेअर केल्या नाहीत.

 

महेश मांजरेकर चित्रपट सृष्टीत आल्यापासून त्यांनी आपल्या अभिनयाने छाप सोडली आहे. उत्तम आणि अभ्यासू अभिनय अशी त्यांची ओळख, त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून गेले आहेत.

 

मांजरेकर यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी काहींना माहीत नाहीत. त्यांच्या पत्नी मेधा मांजरेकर देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. मेधा आणि महेश यांना तीन मुले आहेत. सई, अश्र्वमी आणि सत्या अशी त्यांची नावे आहेत.

 

सई मांजरेकर ही महेश यांची थोरली लेक आहे. तिने आत्ता बॉलिवूड मध्ये पदार्पण केले आहे. ती कोणत्या न कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. ती दररोज सोशल मीडियावर बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

 

त्यामुळे ती कायम चर्चेत येऊ लागली आहे. सईचे फॅन्स वर्ग देखील मोठा आहे. सईने दबंग – 3 या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले आहे. भविष्यात ती खूप मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button