Maharashtra Teacher Bharati 2026 | राज्यात येत्या काही दिवसात मोठी शिक्षकांची भरती होणार आहे. तब्बल ९ हजार नवीन शिक्षकांना यामध्ये संधी मिळणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तसेच महानगरपालिकेतील शाळांमध्ये तसेच नगरपालिकांमधील शाळांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. येत्या मार्च महिन्यात या भरती प्रक्रियेला राबविण्यास सुरुवात केली जाणार आहे. तर पुढील काहीच महिन्यात या शिक्षकांना शिकविण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत. अशा इच्छुक उमेदवारांनी तयारीला लागावं लागणार आहे.
हिवाळी अधिवेशनामध्ये शिक्षक भरतीचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला होता. राज्यात शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे शिक्षक भरती जाहीर करावी. अशा मागणीने अधिवेशन कडाडले होते. महाराष्ट्र राज्यात १ लाख ९० हजाराहून अधिक शिक्षक जागा मंजूर आहेत. आणि या मंजूर जागा शासनाच्या माध्यमातून हळूहळू भरती प्रक्रियेतून भरल्या जाणार असल्याचे सांगितलं जात आहे. यातीलच एक टप्पा म्हणजे येणारी शिक्षक महा भरती. Maharashtra 9000 Teacher Vacancy
जाहिरात प्रकाशित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी या भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केली जाऊ शकते. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पवित्र पोर्टलवर होणार आहे. अशी माहिती शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली आहे. या भरतीमध्ये अतिरिक्त जागांचा देखील समावेश करण्यात आला आहे. तसेच यामध्ये जे शिक्षक मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्ती घेत आहेत अशा रिक्त जागांचा देखील यामध्ये समावेश केला जात आहे.
त्यामुळे शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून जे उमेदवार तयारी करत होते. त्याचं लवकरच स्वप्न पूर्ण होणार आहे. ज्या सरकारी शाळा शासन चालवते अशा शाळांमध्ये ५७०० पदे तर यामध्ये समाविष्ट केलेली अतिरिक्त शिक्षक आणि सेवानिवृत्त होणारे शिक्षक अशी ९ हजार पदांची ही मेगा भरती होणार आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या जागांना आधी प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे जे अतिरिक्त २४०० शिक्षक आहेत त्यांना आता शाळा मिळणार आहे. Maharashtra Govt Teacher Jobs 2026
त्यामुळे त्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. जे शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत अशांना सामील करून त्याची जाहिरात बनवून पवित्र पोर्टल वर प्रसिद्ध करण्याच्या सूचना शासनाने शिक्षण विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच या भरतीची जाहिरात पवित्र पोर्टल वर प्रसिद्ध होईल. त्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करून या भरती प्रक्रियेत सामील व्हायचं आहे.
त्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी तयारी करत आहेत, अशा उमेदवारांनी कागदपत्र आणि इतर सराव सुरू करावेत. १ लाख ९० हजार मंजूर जागांपैकी हा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे. हळूहळू मंजूर पदातील भरती प्रक्रिया होईल, असेही सांगण्यात येत आहे. राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक परिवर्तन घडून येत नाही. विद्यार्थ्यांमध्ये हुशारी समोर येत नाही. Maharashtra Teacher Online Application March 2026
कमी शिक्षकांच्या जीवावर शेकडो विद्यार्थी असल्यामुळे शिक्षकांवर देखील मोठा ताण येत आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर शिक्षक भरती काढून राज्यातील सरकारी शाळांमध्ये त्यांची नियुक्ती करावी. अशी मागणी मागील काही महिन्यांपासून जोर धरत होती. याच कारणामुळे ही भरती प्रक्रिया राबविली जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी तयारीला लागण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शिक्षक भरतीसाठी या गोष्टींची पूर्तता करावी लागेल? Maharashtra Teacher Bharati 2026
या शिक्षण भरतीमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर DED आणि BED पदवी आवश्यक आहे. त्याच बरोबर पात्रता परीक्षा म्हणजेच TET किंवा TALT एक्झाम स्कोअर हवा. या भरतीसाठी तुमची शैक्षणिक सर्व कागदपत्रे, TET किंवा TALT परीक्षेचा स्कोअर, जात प्रमाणपत्र तुम्हाला लागू असेल तर, रहिवासी दाखला, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो तसेच नॉन क्रीमिलियर दाखला हे कागदपत्र तयार ठेवा.
FAQ – या विषयातील वारंवार विचारले जाणारे प्रश्न
९ हजार पदांसाठी भरती जाहिरात कधी प्रसिद्ध होईल?
उत्तर – या भरती प्रक्रियेतील जाहिरात मार्च अखेरपर्यंत प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिक्षक भरती प्रक्रिया कोणत्या विभागातून राबविली जाते?
उत्तर – शिक्षक भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाच्या मार्फत राबविली जाते.
या भरतीसाठी कोणती मुख्य परीक्षा ग्राह्य धरली जाते?
उत्तर – शिक्षक भरतीसाठी TET परीक्षा ग्राह्य धरली जाते.
शिक्षक बनण्यासाठी शिक्षण काय असावे लागते?
उत्तर – शिक्षक बनण्यासाठी DED आणि BED ही पदवी लागते.
शिक्षक भरतीसाठी वयोमर्यादा काय असते?
उत्तर – १८ ते ३८ वर्षातील पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
या भरतीची माहिती कोणत्या संकेतस्थळावर मिळेल?
उत्तर – महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेस्थळावर या भरतीची माहिती दिली जाते.
जाहिरात आल्यानंतर पुढे काय करायचे – पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर ती डाउनलोड करा. व्यवस्थित लक्ष देऊन प्रत्येक शब्द न शब्द वाचून काढा. जाहिरातीत दिलेल्या कागदपत्रांची यादी तयार करून त्याची एक चांगली फाइल तयार करा. सिलॅबस तसेच इतर गोष्टी व्यवस्थित वाचा. आणि गुगल वर जाऊन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती जाणून घेतल्यानंतर या भरती प्रक्रियेसाठी सविस्तर अर्ज करा. अर्ज करताना काही अडचणी येत असतील तर जवळच्या आपले सरकार केंद्र मध्ये जाऊन अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर रेसिप्ट जपून ठेवा. आणि प्रवेश पत्र येण्याची वाट पहा. शिक्षण विभागाच्या संकेतस्थळान प्रवेशपत्र अपडेट मिळवा. Maharashtra Shikshak Bharti 2026








