महापारेषणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ४६ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध; लगेच करा अर्ज, Mahapareshan Bharati Maharashtra 2026

February 28, 2026 5:12 PM
Mahapareshan Bharati Maharashtra 2026

Mahapareshan Bharati Maharashtra 2026 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषणमध्ये तरुणांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महापारेषण विभाग सातारा अंतर्गत ४६ पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी १६ मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे जे उमेदवार विद्युत महामंडळावर काम करण्यास इच्छुक होते अशा उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. शिकाऊ उमेदवार – वीजतंत्री या पदासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड महापारेषण विभागात नोकरी करावी लागणार असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.

  • पदाचे मूळ नाव – शिकाऊ उमेदवार – वीजतंत्री
  • एकूण मंजूर पदसंख्या – ४६
  • शैक्षणिक गुणवत्ता – राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद या संस्थेतून वीजतंत्री परीक्षा पास असणे बंधनकारक आहे. मूळ जाहिरात पहावी, पदानुसार शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे.
  • नोकरी करण्याचे ठिकाण – कराड, जि. सातारा, महाराष्ट्र
  • वयाची अट – १८ ते ३० वर्षांचे उमेदवार (मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षं सूट देण्यात आली आहे)
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (अधिकृत संकेस्थळावर)
  • अर्जाची अंतिम तारीख – १६ मार्च २०२६ (जाहिरातीनुसार)

महत्वाचे अधिकृत संकेतस्थळ

मुख्य जाहिरात १ Download Now
मुख्य जाहिरात २ Visit Now 
अधिकृत संकेतस्थळ Visit Now 

 

महापारेषण या विभागाचे मुख्य काम काय?

महापारेषण हा विभाग विजेची संबंधित आहे. महापारेषण आणि महावितरण एक वेगवेगळे विभाग आहेत. महापारेषण हे महावितरण विभागाला वीज उपलब्ध करून विकते आणि महावितरण हे वीज डायरेक्ट नागरिकांना पुरवठा करते. वीज वसुलीतून महावितरण हे महापारेषण यांचे बिल जमा करते. असे मुख्य दोन फरक या दोन विभागांचे आहेत. त्यामुळे अर्ज करण्याच्या पूर्वी हे महत्वाचे फरक अर्जदाराने जाणून घेणे आवश्यक आहे. या पदांसाठी विजेच्या संबंधी पदवी झालेले उमेदवार अर्ज भरू शकतात.

अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी महत्वाची सूचना

  • महापारेषण कराड अंतर्गत भरती प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी भरतीची पूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचा.
  • जाहिरात वाचल्यानंतर अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रांची यादी तयार करा आणि कागदपत्र PDF तयार ठेवा.
  • अर्ज करण्यापूर्वी तुम्ही अर्जासाठी लागणारे शुल्क तुमच्या बँक खात्यामध्ये शिल्लक आहेत का याची खात्री करा.
  • अर्ज भरत असताना प्रत्येक लाइन व्यवस्थित वाचा आणि मगच भरा.
  • अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे का? याची खात्री करा, माहिती चुकली असेल तर ती एडिट करा. आणि त्यानंतर अर्ज सबमिट करा.
  • अर्ज पूर्ण भरल्यानंतर त्याची एक पावती तुमच्याकडे प्रिंट किंवा पीडीएफ स्वरूपात घ्या, अर्जाचे शुल्क भरलेली पावती देखील तुमच्याकडे जतन करून ठेवा.
  • महापारेषण कराड यांच्या अधिकृत संकेतस्थळ कायम चेक करत राहा, आणि प्रवेश पत्राच्या अपडेट तपासात जा.
  • प्रवेशपत्र मिळाल्यानंतर त्याची झेरॉक्स कॉपी घ्या आणि त्याला लॅमिनेट करून घ्या.
  • त्यानंतर प्रवेश पत्रात दिलेल्या सर्व अटी लक्षपूर्वक वाचा.
  • प्रवेश पत्रामध्ये जर तुमच्या बद्दलच्या माहितीत काही चूक असेल तर महापारेषणला संपर्क करा, दूरध्वनी किंवा ईमेलवर त्यांना चुकीच्या माहिती बाबत सांगा. आणि परीक्षेच्या पूर्वी ती चूक दुरुस्त करून घ्या.
  • परीक्षेला जाण्यापूर्वी तुमचा सराव पूर्ण झाला आहे का? याची खात्री करून परीक्षा सोडवा.

Mr. Ganesh Chavan

Ganesh Tanaji Chavan is a digital media professional and founder of Maharashtra Update. He has experience working with Pudhari Media Group and Loksatta.com, delivering reliable news, government scheme updates, and job information across Maharashtra. His mission is to provide accurate and trustworthy information to readers.

Subscribe YouTube

Subscribe

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment