चित्रपसृष्टी हादरली! महाभारत, बालिका वधू या मालिकांमध्ये काम केलेल्या अभिनेत्याचे निधन

मुंबई | गुजराती सिनेसृष्टीत पुन्हा एकदा दुःखाची लाट पसरली आहे. क्युकी सास भी कभी बहू थी या मालिकेतील एका अभिनेत्रीच्या पतीचे निधन झाले आहे. त्यामुळे सगळीकडे शोकाकुल वातावरण पसरले आहे. हिंदी आणि गुजराती सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रसिक दवे याचे शुक्रवारी एका दीर्घ आजाराने निधन झाले.
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना किडणीच्या समस्या होत्या. या आजाराने त्यांना खूप त्रास होत होता. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना डायलसीसवर ठेवण्यात आले होते. यासाठी त्यांना सतत दवाखान्यात जावे लागत होते. १५ दिवसांपुर्वी त्यांना हा त्रास अधिक जाणवू लागला. त्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात भरती केले गेले. त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी रात्री ८ वाजता त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ते ६५ वर्षांचे होते.
त्यांच्या निधनाने पत्नी केतकी, एक मुलगा आणि एक मुलगी शोक सगरात बुडाले आहेत. केतकी यांच्या आई सरिता जोशी आणि दिवंगत वडील प्रवीण जोशी हे थिएटर दिग्दर्शक होते. केतकी यांची धाकटी बहीण पुर्वी जोशी देखील अभिनेत्री आहे. रसिक आणि केतकी दवे हे दोघे पती पत्नी मिळून एक गुजराती थिएटर कंपनी चालवत होते. केतकी यांनी देखील हिंदी मलिका विश्वात दमदार कामगिरी केली आहे. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ आणि ‘बालिका वधू 2’ या मालिकेत त्यांनी दमदार अभिनय केला आहे.
रसिक यांनी साल 1982 मध्ये गुजराती चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. महाभारत मधील त्यांची नंदा ही भूमिका त्यांना घरघरात घेऊन गेली. त्यानंतर त्यांनी संस्कार – धरोहर अपना की या टीव्ही शोमध्ये करसनदास धनसुखलाल वैष्णव यांची भूमिका साकारली होती.
त्यांनी आजवर हिंदी तसेच गुजराती मालिका विश्वात मोठी कामगिरी केली आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रसिक त्यांचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक व्यक्ती त्यांच्या निधनाचे पोस्ट शेअर करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत.