तारक मेहता का उलटा चष्मा’ मधील माधवी भाभीच्या बोल्ड लूकची सर्वत्र चर्चा

मुंबई | मनोरंजनविश्वात काम करणं आणि त्यात आपलं वेगळं स्थान निर्माण करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. देशभरातून लोक मुंबईत दाखल होतात आणि आपलं नशीब बॉलिवूडमध्ये आजमावतात. त्यांना मोठ्या पडद्यावर झळकायचं असतं.

Join WhatsApp Group

 

काही वेळा त्यांना प्रयत्न करूनही यश मिळत नाही मग ते छोट्या पडद्याकडे म्हणजे टीव्हीकडे आपला मोर्चा वळवतात. तिथं मात्र ते यशस्वी होतात. या छोट्या पडद्यावर भारतात सर्वाधिक काळ सुरू असलेली मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा. मुंबईतील गोकुळधाम या सोसायटीत राहणाऱ्या काही कुटुंबांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर ही मालिका आधारलेली आहे.

 

या मालिकेतील मराठी कुटुंबातील माधवी भिडेची भूमिका साकारणारी सोनालिका जोशीही (Sonalika Joshi) खूप लोकप्रिय आहे. ही व्यक्तिरेखा अगदी साध्या सरळ, कुणाच्या अध्यातमध्यात न पडणाऱ्या, नवऱ्याला साथ देणाऱ्या मराठी गृहिणीची आहे. ती सोनालिकाने खूप सुंदर साकारली आहे. माधवी भाभी नेहमी साडीतच वावरते, त्यामुळे प्रेक्षकांनाही त्याची सवय झाली आहे. पण सोनालिकाचा एक हॉट कपड्यांत तोंडात बिडी धरून काढलेला फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता. त्यावेळी सगळ्याच प्रेक्षकांनी तोंडात बोटं घातली होती. याबाबतचं वृत्त पत्रिका डॉट कॉमनं दिलं आहे.

 

सोनालिकाचे केस बारीक कापलेले होते. गळ्यात रंगबिरंगी गळ्यातलं, कानात निळ्या रंगांचं कानातलं, हातात विविधरंगी बांगड्या यामुळे सोनालिकाचा लूक खूपच हॉट दिसत होता. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि माधवी भाभीच्या या अवताराबद्दल प्रचंड चर्चाही झाली होती.

 

सोनालिका सोशल मीडियावर आपले फोटो व्हिडिओ टाकत असते. तिला इन्स्टाग्रामवर 4 लाख 36 हजार फॉलोअर्स आहेत. सोनालिकाने 5 एप्रिल 2004 ला समीर जोशी यांच्याशी लग्न केलं. त्यांना आर्या नावाची मुलगी आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button