Loan Tips: कर्ज घेतल्यानंतर कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कोणाकडून कर्ज वसूल करते?

Loan Tips | कोणतेही मोठ काम करायचे म्हटलं तर त्यासाठी पैसा लागतो. आणि अचानक एवढे पैसे माणूस जमवू शकत नाही. त्यासाठी त्याला बँकेकडून कर्ज घेण्याची आवश्यकता पडते. पैशाची अर्जंट गरज असल्याने कर्जदार बँकेकडून कर्ज (Bank Loan) घेताता, मग त्या कर्जाला जास्त व्याजदर असला तरी कर्जदार कर्ज घेतो. आणि त्याची नड भागवतो. मात्र कधीकाळी कर्जदाराचा मृत्यू होतो.
यावेळी घेतलेले कर्ज कोण फेडणार? असा सवाल तुम्हाला पडला असेल, आज आम्ही या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देणार आहोत. कर्जदाराने कर्ज घेतले आणि त्यातील काही कर्ज भरले. मात्र काही दिवसानंतर जर कर्जदाराचां मृत्यू झाला. तर बँक ते कर्ज कोणा कडून वसूल करते. यावर आज आपण बोलणार आहोत.
वयक्तीत कर्ज (Personal Loan) – जर एखाद्या बँकेकडून पर्सनल लोन घेतले असेल. आणि कर्जदार काही कारणाने मृत होत असेल तर पर्सनल लोन हे बँक वसूल करू शकत नाही. कारण असे कर्ज असुरक्षित श्रेणीत येत असते. त्यामुळे बँक कायदेशीर वारस किंवा जमीनदाराकडून हे कर्ज वसूल करू शकत नाही.
वाहन कर्ज (Car Loan, Bike Loan) – जर कर्जदाराने त्याच्या वाहनावर कर्ज घेऊन ते खरेदी केले असेल तर ते कर्ज बँक त्याच्या वारसाकडून वसूल करू शकते. जर वारसाने ते कर्ज भरले नाही तर बँक त्या वाहनाचा नीलाव करून कर्ज वसूल करते. आणि जर कर्जाच्या रकमेच्या कामी त्या वाहनाचे पैसे आले तर बँक कोर्टात याचिका दाखल करून कर्ज वसूल करते.
क्रेडिट कार्ड कर्ज (Credit Card Loan) – अनेक बँकांनी अनेक त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट कार्डचे वाटप केले आहे. बँका त्या कार्ड वर कर्ज वाटप करतात. जर एखाद्या कर्जदाराने क्रेडिट कार्ड द्वारे कर्ज घेतले आणि तो भरू शकला नाही. तर ते कर्ज बँक वसूल करू शकत नाही. सदर कर्ज हे असुरक्षित श्रेणीत मोडते.
गृहकर्ज (Home Loan) – गृहकर्ज हे सुरक्षित श्रेणीत मोडत आहे. जर गृहकर्ज घेऊन एखाद्या कर्ज दाराचा मृत्यू झाला तर बँक ते कर्ज सह कर्जदार / जामीनदार याच्या कडून वसूल करते. त्याने न दिल्यास त्या घराचा निलाव करून ते कर्ज वसूल केले जाते.