आत्ताच्या घडामोडीइतर

आणखी एका मोठ्या बँकेचा RBI कडून परवाना रद्द | RBI Tack Action

Rbi Tack Action On this Bank | गेल्या काही दिवसांपासून RBI कडून अनेक बँकांवर कारवाई केली जात आहे. अनेक बँका Rbi कडून बंद केल्या जात आहेत. त्यामुळे अनेक खातेदार सध्या चिंतेत सापडले आहेत. आणखी एका मोठ्या बँकेवर Rbi ने कारवाई केली आहे. बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

आत्ताच पुण्यातील रुपी सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला होता. आता आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. सोलापुरातील लक्ष्मी को – ऑपरेटिव्ह (Lakshmi Co. Operative Limited) या बँकेवर RBI कडून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या बँकेतील खातेदारांना मोठा धक्का बसला आहे.

अनेक खातेदार मोठ्या चिंतेत सापडले आहेत. या बँकेचे हजारो खातेदार आहेत. सध्या या बँकेचा मोठा कार्यभार हा सोलापूर जिल्ह्यात आहे. मात्र पुरते भांडवल नसल्यामुळे या बँकेचा RBI कडून परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याबाबत RBI ने ट्विट करून माहिती दिली आहे.

Rbi च्या माहिती नुसार सदर बँकेतील अनेक खातेदारांच्या ठेवी बँक पुरेसे भांडवल नसल्याने सर्व देऊ शकत नाही. 5 लाख रुपयांपर्यंत ठेव असलेले खातेदार दावा करू शकतात. या वर्षात अनेक बँकांवर RBi कारवाई करू लागला आहे. त्यामुळे खातेदारांचां सहकारी बँकांवर असलेला विश्वास कमी व्हायला लागला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button