आत्ताच्या घडामोडीठळक बातम्या

Fact Check | ‘होम मिनिस्टर’ मालिका होणार कायमची बंद? कारण ऐकून….

मुंबई | गेल्या काही वर्षांपासून झी मराठी वर चालत असलेली होम मिनिस्टर ही मालिका एका उंच शिखरावर जाऊन पोहचली आहे. या मालिकेत आदेश बांदेकर हे स्पर्धा घेऊन विजेत्याला एक पैठणी साडी भेट देतात. ही मालिका अत्यंत लोकप्रिय बनली आहे.

 

झी मराठीवर चालणाऱ्या या मालिकेला अनेक बडे पुरस्कार देखील मिळाले आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन निखिल शिगवण यांनी केले आहे. आत्तापर्यंत या मालिकेचे 3 हजार 366 एपिसोड यशस्वी पणे दाखवण्यात आले आहेत.

 

प्रत्येक एपिसोड चाहत्यांना एक वेगळं काहीतरी देऊन गेला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिके बाबत एक वेगळी चर्चा होऊ लागली आहे. झी मराठी वरील होम मिनिस्टर ही मालिका बंद पडण्याची चर्चा सुरू आहे.

 

त्यामुळे चाहत्यांमध्ये भलतीच नाराजी दिसू लागली आहे. येत्या काही दिवसात या मालिकेच्या भागात विजेत्या वहिनींना 11 लाख रुपयांची पैठणी साडी मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांना वाटू लागले आहे की ही मालिका बंद होणार आहे.

 

शेवटचा एपिसोड झक्कास करून मालिका बंद होणार असल्याची भीती चाहत्यांमध्ये आहे. त्यामुळे चाहते नाराज दिसू लागले आहेत. मात्र आम्ही याची सत्यता पडताळून माहिती काढली असता. ही मालिका बंद होणार नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका असे सांगितले जात आहे.

 

मात्र जर तुम्हाला 11 लाख रुपये पाहिजे असतील. तर या मालिकेच्या माध्यमातून तुम्हाला जिंकण्याची संधी आहे. या मालिकेतील स्पर्धेत भाग घेऊन 11 लाखाची पैठणी तुम्ही तुमच्या नावावर करू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button