आत्ताच्या घडामोडी

दुःखद! जगप्रसिद्ध गायकाचे वयाच्या 33व्या वर्षी निधन; असा झाला भयानक शेवट

दिल्ली | जागतिक कला विश्वाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. 33 वर्षीय जगप्रसिध्द गायकाची प्राणज्योत मावळली आहे. त्यामुळे जगात शोक व्यक्त केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

 

गेल्या काही दिवसांपूर्वी जगप्रसिध्द गायक लता मंगेशकर यांचं निधन झाले होते. त्यानंतर त्या दुःखातून सावरायला चाहत्यांना बराच वेळ गेला होता. त्यात आत्ता आणखी एका जगप्रसिध्द गायकाच्या निधनाची बातमी समोर आली आहे.

 

त्यामुळे चाहता वर्ग मोठ्या दुःखात पडला आहे. ब्रिटिश आयरिश बॉय बँड ‘द वॉन्टेड’ ग्रुपचा सदस्य टॉम पार्कर याचे वयाच्या 33व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. त्यामुळे चाहता वर्गात मोठा दुःखाचा डोंगर पसरला आहे.

 

टॉम हा हॉलिवूड मधील एक प्रसिध्द गायक होता. त्याने शेकडो गाणी गायली आहेत. तसेच त्याचे भारत देशा सोबत जगभरात करोडो चाहते आहेत. त्याचे फॅन फॉलॉविंग देखील चांगले आहे. मात्र त्याचा अंत एका भयानक आजाराने झाल्याचे सांगितले जात आहे.

 

टॉम याला कर्करोग झाला होता. गेल्या दीड वर्षापासून तो रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र कर्करोगाशी त्याची झुंज अपयशी ठरली आहे. 2018 साली त्याचे लग्न झाले होते. त्यानंतर पहिल्या वर्षात त्याला मुलगा झाला होता.

 

मृत्यूवेळी त्याचे वय 33 वर्ष होते. मिळालेल्या माहिती नुसार सकाळी त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली होती. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील सदस्य एकत्र आले होते. कुटुंबाच्या समवेत त्याने जगाचा निरोप घेतला आहे.

 

त्याच्या निधनाची बातमी चाहत्यांना समजल्यावर चाहते फारच दुःखात पडले होते. जगातील अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. टॉमच्या निधनाची बातमी त्याच्या पत्नीने सोशल मीडियावर लेख लिहून दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button