मॅडम आणि विद्यार्थ्याचा भन्नाट डान्स; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई | सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे कधीही कुणाचाही व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होऊ शकतो. अशात सध्या एका शाळेतील फेअरवेल पार्टीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र व्हिडिओ पाहून अनेक जन थक्क झाले आहेत.

सोशल मीडियावर अनेक डान्स, पेंटिंग, रील असे रोज लाखो व्हिडिओ पोस्ट होत असतात. हातात सहज फोन घेतला आणि इंस्टाग्राम अकाउंट उघडलं तर स्क्रोलिंगमध्ये कधी एक तास वाया गेला हेच समजत नाही.

अशात यामध्ये आपल्याला अनेक चांगले आणि वाईट व्हिडिओ दिसत असतात. लहान मुलांच्या हसण्या रडण्या पासून‌ते अगदी शाळेत शिकवत असलेल्या धड्यांपर्यंत असे अनेक व्हिडिओ आपण पाहतो.

यामध्ये जर शाळेतला व्हिडिओ असेल तर नक्कीच त्यामध्ये लहान मुलं, शिक्षक आणि एखादा चांगला अभ्यास असं काही दिसतं. गुरू आणि शिष्य या दोघांचं नातं किती सुरुंदर आणि पवित्र आहे हे सर्वांनाचं माहीत आहे.

मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक विद्यार्थि आणि शिक्षिका मस्त धिनताल होऊन नाचत आहेत. अगदी एखाद्या रोमँटिक कपल प्रमाणे हा डान्स सुरू आहे.

आजकाल अनेक गुरू आणि शिक्षक हे चांगले मित्र असतात. मैत्री असेल तर विद्यार्थ्यांना अधिक चांगल्यापद्धतीने शिकवता येते असं म्हणतात. मात्र प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा असतात. त्यामुळे त्या मर्यादा प्रत्येकाने पाळायला हव्यात. तसे न केल्यास त्या नात्याला काळींबा फासला जातो.

आता व्हायरल होत असलेला शिक्षिका का विद्यार्थ्याचा हा व्हिडिओ  नेमका कुठला आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र हा प्रकार काही नेटकऱ्यांना आवडतो आहे तर काही जण यावर खूप जास्त टीका देखील करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button