आत्ताच्या घडामोडी

भले – भले शोधून थकले! फोटोत एक बिबट्या आहे तो कोणत्या ठिकाणी लपला आहे ते सांगा

बातमी पूर्ण वाचा उत्तर दिले आहे.

दिल्ली | सध्या सोशल मीडियाच्या युगात रातोरात कोणीही फेमस होतं. अनेकजण आपल्या दिवसातील ४ ते ५ तास सोशल मीडियावर सहज घालवतात. अशात आता या सोशल मीडियावर कोणता कलाकार नाही तर एक बिबट्या व्हायरल होतं आहे.

 

एका फोटोग्राफरने दूर डोंगरावर बसून लांबून एक फोटो क्लिक केला. फोटो काढल्यानंतर त्याने झूम करून पाहिले तेव्हा त्याला त्यामध्ये एक बिबट्या दिसला. आता हा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर करत अनेकांना एका नजरेत बिबट्या शोधून दाखवण्याचे आव्हाहन करत आहे.

 

तुम्ही पण हा फोटो पाहिला असेल. आता जरा परत एक नजर टाकून बिबट्या दिसतोय का बघा. नाही दिसत आहे ना? नाहीच दिसणार कारण हा बिबट्या खूप चतुराईने पाहावा लागत आहे.

 

या बिबट्याने अनेकांना चांगलंच कामाला लावलं आहे. बऱ्याच व्यक्ती तासंतास त्याला शोधत आहेत. मात्र सहज हाती लागेल तो बिबट्या कसला. तुम्ही पण अजूनही त्याला शोधत असाल आणि तुम्हाला अजूनही बिबट्या सापडला नसेल तर जास्त अस्वस्थ होऊ नका. कारण आम्ही तुम्हाला हा बिबट्या शोधून देणार आहोत.

 

इथे असलेला हा फोटो पाहा. त्याला थोडं झूम करा. काय मग दिसला का बिबट्या. हा बिबट्या डोंगरात आणि सुकलेल्या झाडांमध्ये दडलेला आहे. त्यामुळे तो सहज एका नजरेत कुणालाच दिसत नाहीये.

 

बिबट्याचा व्हायरल होतं असलेला हा फोटो अभिनव गर्ग याने क्लिक केला आहे. अभिनव ३४ वर्षांचा आहे. त्याला फोटोग्राफीची खूप मोठी आवड आहे. त्यामुळे तो नेहमीच डोंगर कड्यावर प्राण्यांचे वेगवेगळ्या अँगलमधले फोटो शूट करत असतो. पर्वतात बरेच तास प्रतीक्षा केल्यानंतर त्याला हा फोटो क्लिक करता आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button