चिमुकलीला घेऊन संपवलं आयुष्य, एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या; सुसाईड नोट पाहून धक्काच बसेल

दिल्ली | अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नी आणि मुलीला सोबत घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.

 

उत्तर प्रदेशातील सोनू शर्मा नावाच्या व्यक्तीने आपल्या कुटुंबाच्या सोबत जीवन संपवलं आहे. मृत्यू पूर्वी त्याने सुसाईड नोट देखील लिहली आहे. यात बेरोजगारी मुळे आत्महत्या करत असल्याचे त्याने म्हटलं आहे. तो मोल मजुरी करून उपजीविका भागवत होता.

Advertisement

 

घडले असे की सोनू शर्मा हा मजुरी करत होता. मात्र त्या मजुरीमध्ये त्याच्या कुटुंबाची उपजीविका भागत नव्हती. त्यामुळे त्याने पत्नी गीता शर्मा सोबत आत्महत्या करण्याचा विचार केला. लहान मुलगी सृष्टीला सोबत घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

Advertisement

 

सोनू, गीता, सृष्टी आणि एक मुलगा असा परिवार घरात राहत होता. मुलाला पीठ आणण्यासाठी शेजारील घरी पाठवले. त्यानंतर या तिघांनी गळफास घेतला. मुलगा घरात येताच त्याने आरडा ओरडा केला. आणि ही बातमी शेजारच्या व्यक्तींना सांगितली.

 

त्यानंतर याबाबत माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांना घटनस्थळी एक चिठ्ठी सापडली. यात सोनू बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या करत असल्याची माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली. या घटनेनं पूर्ण जिल्ह्यात शोक व्यक्त केला जात आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *