बॉलिवुड हादरलं! प्रसिध्द निर्माते आणि दिग्दर्शकांचे निधन; १००हून अधिक चित्रपटाची केली होती निर्मिती

मुंबई | गेल्या काही वर्षांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गजांचे निधन होण्याच्या बातम्या कानावर येत आहेत. यामुळे चित्रपट सृष्टीला झालंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सुशांत सिंग राजपूत, इरफान खान, ऋषी कपूर, लता मंगेशकर

बप्पी लहरी, केके या सारख्या दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रा कायम भीतीचे वातावरण पसरले असल्याचे दिसत आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी ताजी असताना आणखी एका दिग्गजाने जगाचा निरोप घेतला आहे.

 

प्रसिध्द दिग्दर्शक आणि निर्माते तरुण मजुमदार यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांनी अनेक मालिकांची निर्मिती केली आहे. तसेच अनेक चित्रपटांमध्ये देखील त्यांचा समावेश आहे.

 

छोट्या पडद्यावर झळकलेली बालिका वधू या मालिकेचे देखील त्यांनी दिग्दर्शन केले होते. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होत. गेल्या काही वर्षांपासून तरुण यांना एका भयानक आजाराने ग्रासले होते.

 

त्यानतंर त्यांच्यावर वेळोवेळी उपचार करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी प्रयत्न करून देखील उपचाराचा फायदा झाला नाही, आणि अखेर त्यांची प्राणज्योत मावळली आहे. त्यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रात मोठी पोकळी पडल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button