आत्ताच्या घडामोडी

‘तारक मेहता’ मालिकेच्या चाहत्यांसाठी खुशखबर! तुमची आवडती दयाबेन परतणार

दिल्ली | गेल्या १४ वर्षांपासून तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची अविरतपणे सेवा करत आहे. संपूर्ण कुटुंबीयांसह पाहिला जाणारा हा कार्यक्रम आता पुन्हा एकदा दयाबेनच्या आगमनाची तयारी करत आहे.

 

लवकरच या शोमध्ये दयाबेन परतणार आहे. त्यामुळे चाहते देखील खूप शुद्ध आहे. तसेच सोशल मीडियावर या शोची जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक जण सोशल मीडियावर या मालिकेची चर्चा करत आहेत.

 

अभिनेत्री दिशा वकानी या शोमध्ये येणार, पुन्हा एकदा तसाच विनोदी अभिनय पाहायला मिळणार, अशा अनेक चर्चा रंगल्या आहेत. अशात आता तब्बल पाच वर्षांच्या ब्रेक नंतर खरोखर दिशा मालिकेत येणार आहे का?

 

यावर माध्यमांनी या शोच्या निर्मात्यांनीशी बातचीत केली आहे. असित मोदी हे या शोचे निर्माते आहेत. त्यांनी मुलाखतीत सांगितलं आहे की, ” लवकरच या शो मध्ये दयाबेन परत येणार आहे. मात्र यावेळी दिशा वकानी दयाबेन नसेल. आम्ही दिशाची रिप्लेसमेंट शोधत आहोत. यासाठी ऑडिशन देखील सुरू आहेत.”

 

यावर त्यांनी आता पर्यंत असं का केलं नाही. एवढ्या वेळात तिच्या रिप्लेसमेंटसाठी एवढा वेळ का लावला? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा असित म्हणाले की, ” दिशाने दयाबेन या व्यक्तिरेखेत जीव ओतून अभियनी केला आहे. आजही ती आमच्याच कुटुंबाची एक सदस्य आहे.”

 

पुढे ते म्हणाले की, “सुरुवातीला तिने तिच्या लग्नासाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिने पुन्हा आमच्याबरोबर काम केलं.” त्यानंतर तिच्या पहिल्या बाळंतपणात देखील तिने ब्रेक घेतला नंतर मग कोरोना आणि लॉकडाऊन लागले मात्र तिची छाप प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.

 

त्यामुळे आम्ही तिची वाट पाहत होतो. पण नंतर आता पुन्हा एकदा तिने तिच्या दुसऱ्या बाळासाठी ब्रेक घेतला आहे. त्यामुळे आम्ही तिची रिप्लेसमेंट शोधण्याचा निर्णय घेतला आहे.” साल २०१७ मध्ये दिशाने हा कार्यक्रम सोडला होता.

 

मे महिन्यात तिने आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला त्यामुळे ती आता पुन्हा येऊ शकत नाही. मात्र असं आसलं तरी देखील आता कोणती अभिनेत्री दयाबेन हे पात्र साकारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच प्रेक्षकांना नवी दयाबेन आवडेल का? हा देखील एक मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button