अखेर पोपटलालचं ठरलं लग्न, ‘या’ अभिनेत्रीशी बांधणार लग्नगाठ

दिल्ली | हिंदी टिव्ही सिरिअलमधील सर्वात लोकप्रिय शो म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या कार्यक्रमाने आजवर अनेक रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अशात आता लवकरच या कार्यक्रमात पोपटलाल बाशिंग बांधलेले दिसणार आहेत.

 

या मालिकेविषयी बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. ज्यामध्ये शैलेश लोढाने ही मालिका सोडली आहे तर दया बेहेन पुन्हा एकदा एन्ट्री करण्यास सज्ज झाली आहे. अशात आता पोपटलालच्या लग्नाची चर्चा होताना दिसतेय.

 

या मालिकेत आजवर पोपटलालने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले अशात त्याची जीवनसाथी नेमकी कोण होणार आहे. हेच या बातमीतून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अभिनेत्री खुशबू पटेल ही लवकरच या मालिकेत झळकणार आहे. याची अजून ऑफिशियल घोषणा झालेली नाही.

 

मात्र आम्ही वाचकांसाठी या विषयी थोडं संशोधन केलं. तर आमच्या हाती खुशबू पटेलच इंस्टाग्राम पेज लागलं. यावर तिने तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील अनेक कलाकारांबरोबर फोटो पोस्ट केले आहेत.

 

आता ही खुशबू पटेल आहे तरी कोण हे जाणून घेऊ –
तर मंडळी खुशबू पटेल ही एक अभिनेत्री असून तिला स्टायलिश जीवन जगायला फार आवडते. सोशल मीडियावर ती कायमच सक्रिय असते. आणि आता ती तारक मेहता का उलटा चष्मामध्ये झळकणार आहे. या मालिकेतील काही फोटोंमध्ये तिने कॅप्शन आणि स्टोरी मधून स्वतः याचा खुलासा केला आहे.

 

बाबुजींबरोबर तिने जो फोटो शेअर केला आहे त्यामध्ये तिने असं लिहिलं आहे की, “तुमच्या बरोबर काम करण हे माझ्यासाठी खूप छान आहे.” तसेच तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये मालिकेतील शूटिंगवेळीचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button