आत्ताच्या घडामोडी

Fact Check | तारक मेहता का उल्टा चेश्मा मधील ‘या’ अभिनेत्याचे खरंच निधन झाले आहे का?

दिल्ली | गेल्या काही वर्षांपासून टेलिव्हिजन वर तारक मेहता का उलटा चेष्मा ही मालिका रसिकांच्या मनावर घर करून राहिली आहे. या मालिकेने एक वेगळा रसिक वर्ग निर्माण केला आहे. या मालिकेचे घरा घरात करोडो चाहते आहेत.

 

या मालिकेत मुख्य भूमिकेत जेठालाल, तारक आणि आत्माराम भिडे यांना दाखवण्यात आले आहे. ही मालिका रसिकांना प्रचंड आवडतं आहे. TRP च्या बाबतीत ही मालिका अनेक दिवस अव्वल स्थानी देखील राहिली आहे.

 

मात्र सध्या या मालिकेतील आत्माराम भिडे यांची भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांडवडकर यांचे निधन झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरू लागले आहे. अनेकांनी त्यांचे सोशल मीडियावर श्रद्धांजलीचे बॅनर्स बनवून सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र मंदार यांचे निधन झाले नाही. त्यांच्या निधनाची निव्वळ अफवा असल्याची माहिती खुद्द मंदार यांनी इंस्टाग्राम वर येऊन दिली आहे. ते काही काळापूर्वी त्यांच्या खात्यावर लाईव्ह आले होते.

 

त्यात त्यांनी अशी माहिती दिली. ते म्हणाले की मी सुखरूप आहे. मी स्वस्थ आहे. सोशल मीडियावर शेअर होत असलेली बातमी खोटी आहे. कोणीही अशी माहिती शेअर करू नये, देव त्यांना सद्बुद्धी देवो. मला माझ्या एका मित्राने व्हायरल पोस्ट शेअर केली.

 

त्यामुळे मी सुखरूप असल्याची माहिती तुम्हाला देऊ इच्छित होतो. त्यामुळे मी लाईव्ह येऊन तुम्हाला माहिती देत आहे. त्यामुळे कोणीही अशा बातम्यांवर विश्वास ठेऊ नये. ही खोटी आहे. अशी माहिती खुद्द मंदार यांनी लाईव्ह येऊन दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button