आत्ताच्या घडामोडी

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतील कलाकार एका एपिसोड साठी घेतात लाखोंचे मानधन

दिल्ली | तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील सर्वच कलाकार आपल्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देतात. त्यामुळेच आजही ही मालिका प्रसिद्धी झोतात आहे. ही मालिका गेली अनेक वर्षे रसिक प्रेक्षकांना आपल्या मनोरंजनाने खळखळून हसवत आहे. अशात यातील प्रत्येक कलाकार त्याच्या एका एपिसोड साठी नेमकं किती मानधन घेतो हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहिती तर ही बातमी शेवट पर्यंत वाचा.

 

• शैलेश लोढा
या मालिकेत तारक मेहता हे पात्र शैलेश लोढा साकारतो आहे. तो एक कवी, विनोदी कलाकार आणि लेखक देखील आहे. या मालिकेसाठी दर एपिसोड साठी १ लाख रुपये फी घेतो.

 

• दिलीप जोशी
या मालिकेत जेठालाल हे मुख्य पात्र अभिनेता दिलीप जोशी साकारत आहे. दिलीप जोशी याने हे पात्र इतकं दमदार साकारलं आहे की, प्रेक्षकांना जेठालालच्या भूमिकेत त्यालाच पाहायला आवडते. दिलीप या मालिकेतील एका एपिसोडचे तब्बल १.५ लाख रुपये मानधन घेतो.

 

मुनमुन दत्ता
मुनमुन दत्ता ही या मालिकेत बबिताजी हे पात्र साकारते. मुनमुन सोशल मीडियावर देखील चांगलीच चर्चेत असते. तिच्या अफेअरच्या प्रकरणांमुळे अनेकदा तिला मोठं ट्रोल देखील केलं गेलं आहे. ही अभिनेत्री ३० ते ३५ हजार रुपये मानधन एका एपिसोड साठी घेते.

 

• अमित भट्ट
अमित भट्टच वय साधारणतः ४८ वर्षे आहे. मात्र या मालिकेत तो ७० वर्षांच्या बापूजीची भूमिका साकारतो. यासाठी तो ७० ते ८० हजार रुपये मानधन प्रत्येक एपिसोड साठी घेत आहे.

• श्याम पाठक
श्याम या मालिकेत पोपटलाल हे पात्र साकारतो. यासाठी तो २८ ते ३० हजार मानधन घेतो. पोपटलाल या मालिकेत एक पत्रकार आहे. त्याची कॉमेडी प्रेक्षकांना खूप आवडते. सध्या मालिकेत त्याच्याच लग्नाचा गोंधळ आणि मज्जा पाहायला मिळत आहे.

 

• तनुज महाशब्दे
तनुज या मालिकेत कृष्णा अय्यर हे पात्र साकारतो आहे. यामध्ये तो बबिताजी चा पती आहे. त्याचा अभिनय देखील खूप दांडगा आहे. तनुज या मालिकेतील एका एपिसोड साठी ७० ते ८० हजार रुपये मानधन घेतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button