सनी देओलचा अपघात; उपचारासाठी अमेरिकेतील रुग्णालयात दाखल, चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण

मुंबई | दिग्गज अभिनेता सनी देओल बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्याला थेट अमेरिकेतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपल्या अभिनयाने करोडो चाहत्यांच्या मनावर सनी देओल ने कायम राज्य केलं आहे. त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून गेले आहेत.
त्याने आत्तापर्यंत १०० हून अधिक चित्रपटात भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. तो सोशल मीडियावर देखील काही प्रमाणात सक्रिय असतो. गेल्या काही दिवसांपासून तो काय करतो? तो कुठे असतो? याबाबत अनेकांना माहीत नाही. त्याचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे.
आत्ताच झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी देखील सनी देओल हजर नव्हता. तो सध्या विद्यमान खासदार देखील आहे. मात्र तो निवडणुकीसाठी का उपस्थित नव्हता असा प्रश्न अनेकांनी केला होता. मात्र याचे निश्चित कारण कोणाला समजू शकले नव्हते.
गेल्या दोन आठवड्या पूर्वी एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्याचा छोटा अपघात झाला होता. यामुळे त्याच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यानंतर दुखापती साठी त्याने मुंबई तील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू केले.
मात्र त्यानंतर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अमेरिकेतील रुग्णालयात उपचार घ्यायला सांगितले आहेत. त्यामुळे तो तात्काळ अमेरिकेतील रुग्णालयात दाखल झाला आहे. अशी माहिती त्याच्या एका जवळच्या सहकारी मित्राने दिली आहे. सध्या सनीची प्रकृती स्वस्त आहे.
मात्र त्याला काही दिवस विश्रांती करण्याची आवश्यकता आहे. तसेच तो पुढील काही दिवस अमेरिकेत राहणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. तो लवकर बरा व्हावा यासाठी अनेक जण देवाकडे प्रार्थना करताना पाहायला मिळत आहेत.